कर्जाला कंटाळून...छोट्या मुलीसह आई वडिलांची आत्महत्या. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, September 6, 2021

कर्जाला कंटाळून...छोट्या मुलीसह आई वडिलांची आत्महत्या.

कर्जाला कंटाळून...छोट्या मुलीसह आई वडिलांची आत्महत्या.

पोटच्या लेकीला दिला गळफास... केडगाव परीसरात खळबळ

संदीप फाटक यांचे कोंडीराम वीरकर हे सासरे. केडगाव ही संदीप फाटक यांची सासूरवाडी. केडगावदेवी भागातील ठुबे मळ्यात अलीकडेच ते राहायला गेले होते. रात्री फाटक कुटुंबाचे नातेवाईकांशी दूरध्वनीवरून बोलणेही झाले होते. सकाळी बराच काळ प्रतिसाद न मिळाल्याने शेजारी तसेच सासुरवाडीच्या लोकांनी घरी जाऊन पाहिले असता तिघेही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. फाटक गेल्या काही काळापासून आर्थिक विवंचनेत होते. त्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः केडगाव परीसरातील  संदीप दिनकर फाटक वय 40 वडील, किरण संदीप फाटक वय 32 आई व मैथिली संदीप फाटक वय 10 मुलगी या एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याने केडगाव परीसरात खळबळ उडाली आहे.
संदीप फाटक हे केडगावमधील मोहिनीनगर भागात राहत असून ते किराणा व्यावसायिक होते. आज सकाळी केडगाव देवी रोडवरील अथर्व नगर येथे ही घटना घडली. समोर आलेल्या प्राथमिक चौकशीतून समोर आलं आहे की, आर्थिक विवंचेनेतून ही आत्महत्या करण्यात आली आहे. एकाच कुटुंबातील तिघांच्या आत्महत्येनं नगर शहर हादरुन गेलं आहे. एकाच कुटुंबातील तिघांनी गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे. आधी मुलीला गळफास देऊन नंतर पती-पत्नीने गळफास लावून घेतल्याचा अंदाज लावण्यात आला आहे.
घटना प्रथम आज आजूबाजूच्या लोकांना कळाली त्यांनी तात्काळ कोतवाली पोलीस ठाण्याशी संपर्क साधला, कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी या ठिकाणी पंचनामा केला असून एक चिट्ठी सुद्धा सापडली असून ती पोलिसांनी हस्तगत केलेली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून पुढील कार्यवाही सुरू केली आहे. तसंच शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

No comments:

Post a Comment