अल्पवयीन मुलीवर बालविवाह लावून अत्याचार ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, September 16, 2021

अल्पवयीन मुलीवर बालविवाह लावून अत्याचार !

 अल्पवयीन मुलीवर बालविवाह लावून अत्याचार !

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पाठपुराव्यानंतर गुन्हा दाखल..
मांत्रीकाकडून ही अघोरी उपचार.



नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा आईने काका व मावशीच्या मदतीनं बालविवाह केला असल्याचं काही दिवसांपूर्वी उघड झालं होतं. या अल्पवयीन मुलीवर चार महिने अत्याचार करण्यात आले असून बालविवाह करून तिला मारहाण करणार्‍या नवर्‍यासह नातेवाईकांविरोधात नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंनिसच्या राज्य सचिव रंजना गवांदे यांच्या पाठपुराव्यानंतर अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बायको नांदत नाही म्हणून नवर्‍यानं मांत्रिकाकडे उपचार घेतले होते. या मंत्रिकावरही जादूटोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेवासा तालुक्यातील एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह तिच्याचं आईनं काका आणि मावशीच्या संगनमतानं नेवासा तालुक्यातील माळी चिंचोरा येथील 24 वर्षीय मुलाशी लावून दिला. काही दिवस आपल्याजवळ ठेवल्यानंतर अल्पवयीन मुलीच्या आजोबांना कोणतीही माहिती न देता सासरी पाठवलं. मात्र सासरी गेल्यावर या अल्पवयीनं मुलीचा मोठ्या प्रमाणावर छळ केला जाऊ लागला. नवर्‍यासह सासू विविध कारणांनी मारहाण करत असलायची तक्रार मुलीनं दिली आहे. 4 महिने नवर्‍यानं इच्छा नसताना शारीरिक संबंधही ठेवले तर कायम मारहाणसुद्धा केली असल्याचा आरोप या अल्पवयीन मुलीनं केला आहे. चार महिन्यानंतर सादर मुलगी काम करत नाही. तिला बाहेरची बाधा झाली असलायचं सांगत सासरच्यांनी तिला आईकडे आणून सोडलं. यावेळी आईनं तिला राहुरी तालुक्यातील एका मांत्रिकाकडे घेऊन जात, अघोरी उपचारसुद्धा केल्याचा आरोप मुलीनं केला आहे. हे सर्व प्रकरण मुलीच्या आजोबांना समजल्यावर त्यांनी तत्काळ अंनिसच्या रंजना गवांदे यांना हकीकत सांगितली. अंनिसच्या माध्यमातून हे प्रकरण समोर आलं. दरम्यान अखेर गवांदे यांच्या पाठपुराव्यानंतर आणि अल्पवयीन मुलीच्या आजोबांच्या साथीनं या मुलीच्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण, बालविवाह प्रतिबंधक अधिनियम, बाल लैंगिक अत्याचारांसोबतच इतरही अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment