पाटील मेन्स वेअरने व्यवसायात स्वतःचा ब्रँड निर्माण केला - आ.संग्राम जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, September 30, 2021

पाटील मेन्स वेअरने व्यवसायात स्वतःचा ब्रँड निर्माण केला - आ.संग्राम जगताप

 पाटील मेन्स वेअरने व्यवसायात स्वतःचा ब्रँड निर्माण केला - आ.संग्राम जगताप

‘पाटील मेन्स वेअर’ उद्योग समूहाचा वर्धापन दिन साजरा

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः युवकांनी शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर शासकीय नोकरीच्या पाठीमागे न लागता आपल्याआवडीच्या व्यवसायाकडे वळावे व्यवसाय करत असताना ग्राहकांना व्यवसायामध्ये चांगल्या दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्या तसेच ध्येय, चिकाटी, मेहनतीच्या जोरावर व्यवसायामध्ये यशाचे शिखर नक्कीच गाठता येथे पाटील मेन्स वेअर उद्योग समूहाचे संचालक निलेश शिंदे यांनी कमी वयामध्ये कपड्याच्या व्यवसायात स्वतःचा एक नवीन ब्रँड तयार करून संपूर्ण राज्यामध्ये सदर ब्रँड पोचविण्याचे काम केले आहे
. या माध्यमातून आपल्या उद्योगसमूहाच्या 40 शाखा स्थापन करून अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम यांनी केले आहे तसेच ग्राहकांचा विश्वास देखील त्यांनी संपादन केला आहे असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.

नगर-कल्याण रोड वरील शिवाजीनगर येथे ‘पाटील मेन्स वेअर’ दालनाच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आमदार संग्राम जगताप यांची सदिच्छा भेट यावेळी समवेत उद्योग समूहाचे संचालक निलेश शिंदे, कारागृह अधीक्षक श्याम शेडगे, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष राजू लोटके, शरद गायकवाड, पै.संभाजी लोंढे, राजेंद्र शिंदे,राहीबाई शिंदे, मा.नगरसेवक धनंजय जाधव, मा.उपमहापौर अनिल बोरुडे, नगरसेवक सचिन शिंदे, नगरसेवक शाम नळकांडे, राजूमामा जाधव, शाम लोंढे, सौरभ गुगळे, गोल्डमॅन आकाश मल्लव, निशिकांत मल्लव, दीपक पोकळे, पंकज गुप्ता आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना राजू लोटके म्हणाले की,एक वर्षापूर्वी पाटील मेन्स वेअर या कापडाच्या दालनाचा शुभारंभ करण्यात आला होता युवा उद्योजक निलेश शिंदे यांनी आपल्या कष्टाच्या व मेहनतीच्या जोरावर वस्त्र उद्योगांमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे अल्पावधी काळातच पाटील मेन्स वेअर संपूर्ण राज्यभरात नावारूपाला आले आहे स्वतःचा ब्रँड तयार करून संपूर्ण राज्यात त्यांनी एक ओळख निर्माण केली आहे.

No comments:

Post a Comment