न्यू आर्टस महाविद्यालयाच्या 1983 बॅचच्या सवंगड्यांचा स्नेहमेळावा उत्साहात - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, September 30, 2021

न्यू आर्टस महाविद्यालयाच्या 1983 बॅचच्या सवंगड्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

 न्यू आर्टस महाविद्यालयाच्या 1983 बॅचच्या सवंगड्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

...अन् आठवणीत हरवले ‘विद्यार्थी’


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अडोतीस वर्षांपूर्वी महाविद्यालयात घालविलेल्या सोनेरी दिवसांच्या आठवणींना उजाळा मिळाला अन् ‘विद्यार्थी’ हरखून गेले. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे नकळत डोळ्यांच्या कडाही ओलावल्या... न्यू आर्ट्स महाविद्यालयाच्या 1983 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळावा अतिशय निसर्गरम्य वातावरणात पार पडला.
काही माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून मित्रांचा ग्रुप तयार करण्यात आला.सर्वांच्या एकत्रित भेटीची कल्पना पुढे आली. त्यानुसार आगडगावजवळील हिराव्यागार डोंगराच्या कुशीत असणार्या ‘सावली’ या ठिकाणी बॅचचे विद्यार्थी 38 वर्षांनी एकत्र आले. या कार्यक्रमात सुमारे 40 माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. सविता थोरात-चोळके, सुरेखा जक्का-आडेप, बाळासाहेब खांदे, श्रीनंदकुमार राऊत यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. प्रास्ताविक माजी प्राचार्य डॉ. नवनाथ टकले यांनी केले. सुरुवातीस सर्वांनी आपली व कुटुंबाची ओळख करून दिली. मित्रांच्या भेटीनेे इम्मुनिटी बूस्टर डोस असल्याचे मत निवृत्त न्या. सुदाम गायके यांनी व्यक्त केले. कर सल्लागार नरेंद्र बागडे यांनी मराठी हिंदी गिते सादर करून कॉलेजमधील स्नेहसंमेलनाची आठवण करून दिली. विमा सल्लागार सुभाष मुथियान यांनी जीवन जगण्याची मजा हलक्याफुलक्या शब्दांमधून व्यक्त केली. मंगल कोकणे-कानवडे यांनी खोडकर, नटखट प्रवृत्तीचे अनेक किस्से सांगितले. पुढील भेट शिक्षकांसह घेण्याचे या वेळी ठरले. कार्यक्रमासाठी उद्योजक बापूसाहेब करपे, वसंतराव ठुबे, माजी प्राचार्य लक्ष्मण पोंदे, माजी सरपंच प्रवीण भन्साळी, दिलीप गांधी, निवृत्त समाजकल्याण अधिकारी सूर्यकांत काजवे, नंदकुमार बंग, विजय राऊत, सुनीता होनराव-सिनगारे आदी उपस्थित होते. सर्व मित्र-मैत्रिणींनी संपूर्ण दिवस आनंदात घातला. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी निवृत्त समाजकल्याण अधिकारी धनाजी शिंद, निवृत्त बँक कर्मचारी नंदकुमार राऊत, अविनाश पाचारे, हॉटेल व्यावसायिक प्रल्हाद खळे यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here