पश्चिम राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेसाठी शहरातील अकरा खेळाडू गुजरातला रवाना - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, August 14, 2021

पश्चिम राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेसाठी शहरातील अकरा खेळाडू गुजरातला रवाना

 पश्चिम राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेसाठी शहरातील अकरा खेळाडू गुजरातला रवाना


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः पश्चिम राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेसाठी अहमदनगर सिटी रायफल अ‍ॅण्ड पिस्तोल शूटिंग क्लबचे अकरा खेळाडू शहरातून अहमदाबादला (गुजरात) रवाना झाले. या राष्ट्रीय स्पर्धेसाठी खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आले.
अहमदाबादला आठवी पश्चिम राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धा होत आहे. यामध्ये पाच राज्यातील खेळाडू सहभागी होणार आहे. या स्पर्धेसाठी अहमदनगर शहरातील अकरा खेळाडूंची निवड झाली असून, हे खेळाडू महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करणार आहेत. यामध्ये देवेश चतुर, हर्षवर्धन पाचारणे, ओम सानप, यश कदम, जयदीप आगरकर, सुमित वैरागर, पार्थ छाजेड, इरफान सय्यद, वीणा पाटील, रोशनी शेख, राजश्री फटांगडे या शहरातील खेळाडूंचा सहभाग आहे. सदर खेळाडूंना रायफल शूटिंग प्रशिक्षक सुनिता काळे, ऋषिकेश दरंदले, अलीम शेख यांचे मार्गदर्शन लाभत आहे. या खेळाडूंना स्पर्धेसाठी आमदार संग्राम जगताप, आनंद लहामगे, शशिकांत पाचारणे, घनश्याम सानप, प्रवीण चतुर, नितीन वाघमारे, राहुल कदम, क्रांती सानप, क्रीडा अधिकारी दिपाली बोडखे, प्राचार्या श्रीमती भिंगारदिवे यांनी शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment