पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावला छत्रपती मराठा साम्राज्य ग्रुप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, August 14, 2021

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावला छत्रपती मराठा साम्राज्य ग्रुप

 पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावला छत्रपती मराठा साम्राज्य ग्रुप

अतिवृष्टीमुळे रस्ते वाहून गेलेल्या गावात पायपीट करुन पोहचवली जीवनावश्यक मदत


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोकणातील महाड, चिपळूणसह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पुराचा फटका बसल्याने या पुरग्रस्तांसाठी छत्रपती मराठा साम्राज्य (सीएमसी) ग्रुप धावून आला आहे. पूरग्रस्तांना सीएमसी ग्रुपच्या सदस्यांनी जीवनावश्यक वस्तूंसह किराणा किट व इतर साहित्याची मदत दिली.
सामाजिक बांधिलकी म्हणून संघटनेमधील सभासदांनी पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्रामधील, महाराष्ट्राबाहेरील तसेच विदेशातील ग्रुपच्या सभासदांनी भरीव मदत पाठवली. ग्रुपचे सदस्य मदत घेऊन पूरग्रस्त भागात दाखल झाले व गरजूं पर्यंत त्यांनी मदत पोहचवली. अनेक परिवारास महिनाभर पुरेल अश्या पद्धतीने जीवनावश्यक अन्न-धान्यासह किराणा किटचे वाटप करण्यात आले. यामध्ये तांदूळ, ज्वारी, गहू, डाळी, तेल, साखर, चहापावडर, पोहे, मसाला, मीठ, मिरची, साबण, कोलगेट, बिस्कीट, फरसाण, मेणबत्ती, माचीस इत्यादी वस्तूचा किटमध्ये समावेश होता.
अतिवृष्टीमुळे ज्यांचे संपूर्ण संसार पुरात वाहून गेले. अशा गरजूंना जीवनावश्यक किट सोबत साड्या, कपडे, भांडी सुद्धा वाटप करण्यात आले. विविध पूरग्रस्त गावात आतापर्यंत सतराशे पेक्षा जास्त किटचे वितरण करण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिथे वाहने जात नाही तिथे आठ ते दहा कि.मी. ची पायपीट करुन ग्रुपचे सदस्य मदत घेऊन गरजू पर्यंत पोहचले.
भूस्खलन झाल्यामुळे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील निवगंण, गुढे, कुढली खुर्द या गावामध्ये दरडी कोसळून मोठया प्रमाणात भात शेतीचे नुकसान झाले होते. छत्रपती मराठा साम्राज्य ग्रुपच्या टीमने गावात किराणा जीवनावश्यक वस्तू कपडे तसेच गरजूंना साड्या तसेच असे सर्व साहित्य सुपूर्द केले. या कार्यात अहमदनगर अ‍ॅडमीन टीमचे संदीप नवसुपे, मनोज सोनवणे, भाग्येश सव्वाशे, संजय शिंदे, प्रमोद काकडे, अशोक गाडे, युवराज काटे, अजिनाथ मोकाटे, वसंत आभाळे, महेश पवार, अक्षय साबळे, अतुल चौधरी, राहुल साबळे, विनायक करवंदे, अक्षय साबळे, अमोल साबळे, शांताराम साबळे, गोकुळ साबळे यांनी विशेष परिश्रम घेतले. या सामाजिक कार्यात सातारा, जळगाव, मुंबई, पुणे, बीड, धुळे, अहमदनगर, गुजरात, नाशिक, कोल्हापूर, सांगली, सोलापूर आदी जिल्ह्यातील छत्रपती मराठा साम्राज्य (सीएमसी) ग्रुपच्या सदस्यांनी सहकार्य केले. छत्रपती मराठा साम्राज्य संघटनेचे संचालक जितेंद्र पवार, धनराज भोसले, ओंकार देशमुख यांनी सर्व सदस्यांच्या कार्याचे कौतुक करुन आभार मानले.

No comments:

Post a Comment