भविष्यकाळात कचरा डेपो हा भाग वनराई होईल : आ. संग्राम जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, August 14, 2021

भविष्यकाळात कचरा डेपो हा भाग वनराई होईल : आ. संग्राम जगताप

 भविष्यकाळात कचरा डेपो हा भाग वनराई होईल : आ. संग्राम जगताप

बुरुडगाव कचरा डेपो येथे वृक्षारोपण

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः पर्यावरण हा मानवाचा एक मित्र आहे. वृक्षांपासून मोफत ऑक्सिजन मिळते. या दृष्टिकोनातून प्रत्येक नागरिकाने वृक्षरोपण मोहिमेमध्ये सहभागी व्हावे. अहमदनगर महानगर पालिकेने वृक्ष संवर्धन समितीच्या वतीने सुमारे पाच हजार वृक्ष लावण्याच्या मोहिमेस लवकरच सुरुवात होणार आहे. यामध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे. दिवसेंदिवस वातावरणात होत चाललेल्या बदलामुळे पर्यावरणाचा रास्ह झाला आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी  वृक्षारोपण व संवर्धन हा एकमेव उपाय आहे.  यासाठी शहर परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षाची लागवड करावी. निसर्गाची हानी झाल्यामुळे  मनुष्यला   विविध संकटाला  सामोरे जावे लागत आहे. वातावरणाच्या बदलामुळे  ऋतुमानात बदल झालेले दिसून येत आहे. सध्या कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सीजनचे महत्व समाजाला अधोरेखित झाले आहे. झाडापासून मानवाला शुद्ध व मोफत ऑक्सिजन मिळतो. कोरोणा च्या काळामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे मानवाला कृत्रिम कृत्रिम ऑक्सिजन विकत घ्यावा लागत आहे. याच बरोबर मानवी आरोग्यावरही याचा विपरीत परिणाम झालेला आहे. मानवाच्या आरोग्य सुदृढ व निरोगी राहण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धन ही लोक चळवळ व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत भविष्यकाळात कचरा डेपोचा भाग हा वनराई  म्हणून ओळखला जाईल. असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
मनपाच्या बुरूडगाव कचरा डेपो येथे वृक्षरोपण करताना आमदार संग्राम जगताप. उपमहापौर गणेश भोसले. विरोधी पक्षनेता संपत बारस्कर. आयुक्त शंकर गोरे. उपायुक्त यशवंत डांगे. नगरसेवक विनित पाऊलबुधे. माजी नगरसेवक बाळासाहेब पवार. उद्यान प्रमुख मेहेर लहारे. राधाकृष्ण कुलट. ओकार देशमुख.  शहर अभियंता सुरेश इथापे. इंजिनीयर श्रीकांत निंबाळकर आदी उपस्थित होते
उपमहापौर गणेश भोसले म्हणाले की अहमदनगर महानगरपालिकेचे बूरुडगाव येथील कचरा डेपो आहे. संपूर्ण शहराचा कचरा संकलन या ठिकाणी होत आहे. व त्यावर ती प्रक्रिया केली जाते. हा भाग स्वच्छ सुंदर हरित राहण्यासाठी येथे वृक्षांची अत्यंत गरज आहे या दृष्टिकोनातून महापालिकेने पावले उचलली असून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येईल.  असे ते म्हणाले
विरोधी पक्षनेता संपत बारस्कर म्हणाले की अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त शंकर गोरे हे  विकाससाठी पॉझिटिव्ह विचार ठेवून काम करत आहे. त्यांच्याकडे आम्ही  विकासाचा प्रस्ताव घेऊन गेल्यानंतर त्याला तात्काळ मान्यता देत आहे. शहरामध्ये वृक्षारोपण मोहीम हाती घेण्यासाठी त्यांचा मोलाचा वाटा आहे. लवकरच शहरांमध्ये 5000 वृक्ष लावण्याच्या मोहिमेला सुरुवात होणार आहे.या मोहिमेमध्ये विविध सामाजिक संस्थांनी व नागरिकांनी व युवांनी सहभागी व्हावे असे ते म्हणाले.
आयुक्त शंकर गोरे म्हणाले की कचरा डेपो येथे वृक्ष लावण्यासाठी  ठेकेदार यांच्या माध्यमातून हाती घेतला आहे. सुमारे दहा ते पंधरा फुटाचे व्रक्ष याठिकाणी लावण्यात येत आहे. कचरा डेपो परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लावण्यात येणार आहे. असे ते म्हणाले

No comments:

Post a Comment