कल्याण रोड वरील गणेश नगर येथील पाण्याच्या टाकीच्या संपवेलच्या कामाचा शुभारंभ. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, August 16, 2021

कल्याण रोड वरील गणेश नगर येथील पाण्याच्या टाकीच्या संपवेलच्या कामाचा शुभारंभ.

 कल्याण रोड वरील गणेश नगर येथील पाण्याच्या टाकीच्या संपवेलच्या कामाचा शुभारंभ.

परिसरातील नागरिकांना पूर्ण दाबाने पाणी मिळणार ः आमदार संग्राम जगताप.
कल्याण रोड पाणीप्रश्नासाठी नगरसेवकांनी सतत पाठपुरावा केला - महापौर.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अनेक वर्षांपासून रखडलेला कल्याण रोडचा गंभीर पाणी प्रश्न मार्गी लागावा यासाठी या भागातील सर्व नगरसेवकांनी मनपा प्रशासनाकडे पाठपुरावा केला.तसेच मी महापौर झाल्यानंतर 15 ऑगस्ट रोजी हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे वचन या भागातील नागरिकांना दिले होते दिलेल्या शब्दाला अनुसरून आज रोजी गणेश नगर पाण्याच्या टाकी खाली संपवेलच्या कामाला निधी उपलब्ध करून देऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.लवकरच हे काम पूर्ण होऊन या परिसरातील नागरिकांना फेज 2 पाणी योजने अंतर्गत पूर्ण दाबाने पाणी उपलब्ध होणार आहे, त्यामुळे अनेक वर्षाचा रखडलेला पाणीप्रश्न मार्गी लावला आहे.मी या भागाचे प्रतिनिधित्व करत असून पुढील दोन वर्षांमध्ये या भागाचा विकास कामांसाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे, त्यामुळे या परिसराची विकसित स्वतंत्र उपनगर म्हणून ओळख निर्माण होईल असं मत महापौर रोहिणी शेंडगे यांनी व्यक्त केला आहे
नगर शहरातील कल्याण रोड परिसरातील पाण्याचा गंभीर असा प्रश्न सोडविण्यासाठी या परिसरातील नगरसेवकांनी अनेक आंदोलने केली. सतत पाठपुरावा केला त्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला आहे. फेज 2 पाणी योजनेअंतर्गत गणेश नगर मध्ये बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीत संपवेल उभारण्याचे काम आता हाती घेण्यात आले असून या परिसरातील नागरिकांना पूर्ण दाबाने पाणी मिळणार असल्याचे प्रतिपादन संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.कल्याण रोड वरील गणेश नगर येथील पाण्याच्या टाकी खाली संपवेलच्या कामाचा शुभारंभ आ.संग्राम जगताप व महापौर रोहिणीताई शेंडगे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी महापौर रोहिणी शेंडगे व आ.संग्राम जगताप बोलत होते.  याप्रसंगी आ.जगताप म्हणाले की, कल्याण रोड परिसर हा नगर शहराच्या अत्यंत जवळचा भाग आहे. या परिसरामध्ये विविध विकास कामे सुरू असल्यामुळे नागरी वसाहती झपाट्याने वाढत आहे या भागाचा अनेक वर्षाचा पाणीप्रश्न गंभीर बनला होता, परंतु हा प्रश्न आता मार्गी लागला आहे. हा प्रश्न मार्गी लागण्यासाठी फेज 2 पाणी योजनेअंतर्गत गणेश नगर येथे पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे या टाकीमध्ये पाणी पुरवठा होत नव्हता यासाठी पाण्याच्या टाकी खाली संपवेल उभारण्याचे काम हाती घेतले आहे.हे काम लवकरच मार्गी लागणार आहे त्यानंतर कल्याण रोड परिसराला पूर्ण दाबाने पाणी उपलब्ध होणार आहे.या परिसरातील नगरसेवकांनी हा पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी मनपाकडे पाठपुरावा केला होता, तो पाणी प्रश्न आता मार्गी लागणार आहे तसेच या भागाच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून, टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे ही आमदार जगताप म्हणाले.
यावेळी उपमहापौर गणेश भोसले,विरोधी पक्षनेता संपत बारस्कर,मा.महापौर शीलाताई शिंदे,मा.उपमहापौर अनिल बोरुडे,मा.विरोधी पक्षनेता संजय शेंडगे,मा.शहर प्रमुख संभाजी कदम नगरसेवक श्याम नाळकांडे, नगरसेविका पुष्पाताई बोरुडे,नगरसेवक सचिन शिंदे, नगरसेवक प्रशांत गायकवाड,नगरसेवक डॉ.सागर बोरुडे, दत्ता जाधव,इंजि.परिमल निकम,इंजि. गणेश गाडकर,परुनाथ ढोकळे,मा.प्रा.खासेराव शितोळे,शेखर  ऊंडे, शशिकांत तांबे, नारायण शेळके, हिरामण गुंड, राजेंद्र तापकिरे,अघाव गुरुजी,पोपट शेळके, अविनाश पांढरे, दत्तात्रेय कर्डिले, रामदास दाते, गणेश शिंदे,विजय कांडेकर,संतोष ठाणगे,संतोष नगरे,अमोल शिंदे, सुबोध कुलकर्णी,विठ्ठल वांडेकर, पोपट शेळके,विठ्ठल अलवाल,ड. सतिष गीते तसेच आदी मान्यवर उपस्थित.

No comments:

Post a Comment