जागतिक स्तरावर भारताची “महासत्ता” म्हणून ओळख. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, August 16, 2021

जागतिक स्तरावर भारताची “महासत्ता” म्हणून ओळख.

 जागतिक स्तरावर भारताची “महासत्ता” म्हणून ओळख.

तिसर्‍या लाटेचे संकट समोर उभे आहे - मुश्रीफ.

पोलिस परेड मैदानावर पालकमंत्री मुश्रीफांचे हस्ते ध्वजारोहन.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः स्वातंत्र्यदिनाचा अमृतमहोत्सव आपण साजरा करत आहोत. अशावेळी स्वातंत्र्यासाठी प्राणाची बाजी लावणा-या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण आणि त्यांच्या विचारांचा वारसा सर्वांनी जपला पाहिजे. स्वातंत्र्यसैनिकांनी केलेला त्याग, देशासाठी सर्वस्व ओवाळून दिलेली प्राणाची आहूती यांचे कायम स्मरण ठेवले पाहिजे. देश स्वातंत्र्य झाल्यानंतरही अनेक आव्हानांचा सामना करत आधुनिक भारताची उभारणी करण्यासाठी स्वातंत्र्योत्तर काळात अनेकांचे योगदान राहिले. विविध क्षेत्रात आपल्या देशाने गगनभरारी घेतली. जागतिक स्तरावर एक महासत्ता म्हणून आपली नव्याने ओळख प्रस्थापित होत आहे असं मत जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त येथील पोलीस परेड मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते.
श्री मुश्रीफ पुढे म्हणाले की, कोरोनाच्या तिस-या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून नागरिकांनीही प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे, संकटाच्या काळातही जिल्ह्यातील विकास कामांच्या अंमलबजावणीचे प्रयत्न सुरु असून त्यासाठी राज्यस्तरावरुनही अधिकाधिक निधी मिळविण्यासाटी पाठपुरावा सुरु आहेत.
कोरोनाचा सामना करण्यासाठी राज्य शासन, जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संघटना योगदान देत आहेत. कोरोनाच्या पहिल्या दोन लाटांचा आपण सामना केला. आता तिस-या लाटेचे संकट समोर आहे. अशावेळी सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळणे, घराबाहेर पडताना मास्कचा वापर करणे, लक्षणे जाणवल्यास तात्काळ उपचार घेणे अशा प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या माध्यमातून आणि प्रत्येकाने योग्य ती काळजी घेत स्वताचे आरोग्य जपावे, असे आवाहन त्यांनी केले.
राज्यातील शेतक-यांना स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी बनवण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. विकेल ते पिकेल या संकल्पनेनुसार शेतमालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी रयत बाजार सुरु करण्यात येणार आहे. एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमा अंतर्गत जिल्ह्यासाठी 11 कोटी 29 लाख रुपये प्राप्त झाले असून, राष्ट्रीय कृषी विकास योजनेत कांदाचाळ उभारणी, शेततळे अस्तरीकरण, नियंत्रित शेती यातील लाभार्थींना अनुदानाचे वितरण आपण केले आहे. असं पालकमंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात जवळपास पावणेतीन लाख शेतक-यांना 2202 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. राष्ट्रीयकृत बँकांनी कर्जवाटपाचा वेग अधिक वाढवावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा पोलीस प्रमुख मनोड पाटील, महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
विधान परिषदेच्या 12 आमदारांची नियुक्ती रखडून ठेवण्यासाठी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर भाजपचा दबाव असून भाजपने राज्यपाल आणि राज्यपाल पदाची अप्रतिष्ठा करू नये 12 आमदारांच्या नियुक्त्या रखडून ठेवल्याने सर्वोच्च न्यायलयाने या निर्णयावर ताशेरे देखील ओढले आहेत, वैधानिक पदावर असलेल्या व्यक्तीला निर्णय घेण्यासाठी भारतीय राज्यघटनेत कोणतीही कालमर्यादा दिलेली नाही, समाजाच्या प्रगतीचे, समाजाच्या उन्नतीचे लक्ष डोळ्यासमोर ठेऊन घटनेची निर्मीती करत असताना घटनेच्या शिल्पकाराने असा विचार केलेला नसेल भविष्यात सार्वजनिक हितापेक्षा स्वहिताला प्राधान्य देणारी मानसिकता निर्माण होऊ शकते असंही न्यायालयाने म्हटले आहे. 9 महिने आमदारांची नियुक्ती थांबवून ठेवणे योग्य नाही. हवं तर राज्यपालांनी एकादा आमदार नको असेल तर आम्हाला कळवावं आम्ही दुसर्‍या आमदारांचे नाव पाठवू पण ते हो देखील म्हणत नाहीत आणि नाही देखील म्हणत नाहीत यावरून त्यांच्यावर भाजपचा किती दबाव आहे हे स्पष्ट होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here