मोहरमनिमित्त हसन व हुसेन सवारीला आमदार जगताप यांच्याकडून चादर अर्पण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, August 20, 2021

मोहरमनिमित्त हसन व हुसेन सवारीला आमदार जगताप यांच्याकडून चादर अर्पण

 मोहरमनिमित्त हसन व हुसेन सवारीला आमदार जगताप यांच्याकडून चादर अर्पण


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर येथील मोहरम राज्यभरात प्रसिद्ध असून, मोहरमनिमित्त कानाकोपर्यातून दर्शन घेण्यासाठी भाविक नगरला येतात. हिंदू-मुस्लिम एकोप्याचे दर्शन या ठिकाणी घडते. सर्वजण गुण्यागोविंदाने सहभागी होतात. जागतिक महामारी कोरोनामुळे शासन नियमांचे पालन करीत प्रशासनास सहकार्य करीत मोहरम संपन्न होत आहेत, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
मोहरमनिमित्त बारा इमाम कोठला येथील हसन व हुसेन यांच्या सवारीस आमदार संग्राम जगताप यांनी चादर अर्पण करून दर्शन घेतले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अफजल शेख, किरण पिसोरे, महेश बुचडे, संतोष ढाकणे, सागर गुंजाळ, नीलेश हिंगे, मळु गाडळकर, सोहेल शेख, विश्वस्त निसार सय्यद, दस्तगीर सय्यद, माजी नगरसेवक सादिक सय्यद, ख्वाजा असद, साहेबान जहागिरदार, संजीव सय्यद आदी उपस्थित होते. आ. जगताप पुढे म्हणाले की, अहमदनगरला मोठी ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे. शहरातील हिंदू-मुस्लिम समाजबांधव नेहमीच विविध सण, उत्सव एकत्रितरित्या गुण्यागोंविदाने साजरे करतात. मागील दीड वर्षापासून कोरोनाने थैमान घातले असून, त्यामुळे अनेक बंधने आपणास पाळावी लागत आहेत. शासकीय नियमांचे पालन करीत सण, उत्सव साजरे करावे लागत आहेत. कोरोनाचे संकट दूर होऊ दे, अशी प्रार्थना सर्वांनी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

No comments:

Post a Comment