गावाने आपल्याला शिक्षण, संस्कार व विचारांची शिदोरी दिली- शिक्षणाधिकारी रामदास हराळ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, August 20, 2021

गावाने आपल्याला शिक्षण, संस्कार व विचारांची शिदोरी दिली- शिक्षणाधिकारी रामदास हराळ

 गावाने आपल्याला शिक्षण, संस्कार व विचारांची शिदोरी दिली- शिक्षणाधिकारी रामदास हराळ

बाबासाहेब बोडखे यांच्या पुढाकाराने पारगाव मौला येथे वृक्षांचा वाढदिवस साजरा


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः पारगाव मौला येथे सीना नदीच्या काठी गावातील ग्रामस्थ व शिक्षक परिषदेचे नेते व माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक बाबासाहेब बोडखे यांनी वृक्षारोपण व संवर्धन करून झाडांचे जतन केले आहे.आज त्या झाडांचा वाढदिवस साजरा करून वृक्षावरचे प्रेम व नाते समाजासमोर आले आहे, हीच वृक्षावरची भावना युवा पिढीला समजणे गरजेचे आहे यासाठी वृक्षारोपण व संवर्धन ही लोकचळवळ व्हावी यासाठी सर्वांनी पुढे येणे गरजेचे आहे.गाव सोडून नोकरी-व्यवसायासाठी शहराकडे जावे लागते त्यानंतर गावाकडे कोणीही वळून पाहिले नाही,परंतु कोरोना मुळे प्रत्येकाला आपले गाव आठवले आहे.गावाने आपल्याला शिक्षण, संस्कार व विचारांची शिदोरी बरोबर दिली असल्यामुळे आपण आपआपल्या क्षेत्रांमध्ये यशस्वी झालो आहे. यामुळेच गावाचे ऋण आपल्यावर ती मोठी आहे. हे फेडण्याचे काम शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी केले आहे .झाडांचा वाढदिवस साजरा करणे व त्यातून गावातील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहीत्य व झाडांची रोपे देवून शिक्षण व पर्यावरण संवर्धनाचा हा उपक्रम कौतुकास्पद व समाजाला प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी रामदास हराळ यांनी केले.
नगर तालुक्यातील पारगाव मौला येथे शिक्षक परिषदेचे नेते व माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक बाबासाहेब बोडखे, अर्जुन बोडखे, भाऊसाहेब पांडूळे व ग्रामस्थांच्यावतीने लावलेल्या झाडांचा वाढदिवस साजरा करून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी माध्यमीक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी रामदास हराळ, समवेत शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे, सौ. निर्मला रामदास हराळ, संचालक महेंद्र हिंगे, सविता हिंगे, प्रा. सतीश सातपुते, सरपंच ज्योती बोठे,आदिनाथ नेटके,धर्मा बोठे, अर्जुन बोडखे, बबन जाधवर, ज्ञानेश्वर कांबळे, भाऊसाहेब पांडुळे, बबन भोसले, हरिभाऊ बोठे, हनुमान बोठे,दीपक खेडकर, वैभव बोठे, नितीन खेडकर, सोमनाथ बोठे, गोरख खकाळ, रभाजी नेटके, पोपट पठाण, गुलाब बोठे, रमेश बोठे, सुरज बोडखे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे म्हणाले की, पर्यावरणाचा दिवसेंदिवस र्‍हास होत चालला असल्यामुळे ऋतुमानात बदल होतात दिसत आहे त्यामुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम झाला आहे. वृक्षारोपण व संवर्धन करणे गरजेचे असल्यामुळे पारगाव मौला ग्रामस्थांना एकत्रित करून गेल्या वर्षी वृक्षारोपण व संवर्धनाची चळवळ उभी केली आज 1 वर्ष पूर्ण झाले आहे. त्यामुळे झाडांचा वाढदिवस साजरा केला जात आहे.झाडे आपल्याला मोफत ऑक्सीजन देण्याचे काम करत आहे, कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सीजनचे महत्व समाजामध्ये अधोरेखित झाले आहे. कोरोनाच्या काळामध्ये रुग्णांना विकत कृत्रिम ऑक्सिजन घेण्याची वेळ आली होती परंतु वृक्ष आपल्याला मोफत ऑक्सिजन उपलब्ध करून देत आहे. वृक्षाचे महत्त्व समाजामध्ये किंवा ग्रामस्थांमध्ये कळावे यासाठी झाडाचे वाढदिवस करणे गरजेचे आहे. नुसतेच वृक्षारोपणाचे फोटो काढण्यापेक्षा लावलेल्या झाडांचे संवर्धन होणे ही तितकेच महत्वाचे आहे. विद्यार्थी शिक्षण घेत असताना झाडाची माहिती कळविली यासाठी वृक्षारोपणाचे व संवर्धनाचे उपक्रम हाती घेतले पाहिजे, आज पारगाव मौला येथील जिल्हा परिषदेच्या 1ली ते 4थी पर्यंतच्या संपूर्ण शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना संचालक बाबासाहेब  बोडखे यांनी स्वःखर्चाने शालेय साहित्य, मिठाई, प्रत्येकाला झाडांची रोपे व प्रत्येकी दोन दोन मास्कचे वाटप करण्यात आले असल्याचे ते म्हणाले. आदिनाथ नेटके यांनी कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन केले. जनाबाई नवले यांनी सर्वांचे आभार मानले. कोविडच्या सर्व नियमांचे पालन करून वृक्षाच्या वाढदिवसाचा कार्यक्रम पार पडला.

No comments:

Post a Comment