यशची कामगिरी अभिमानास्पद अशीच- भगवान फुलसौंदर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 17, 2021

यशची कामगिरी अभिमानास्पद अशीच- भगवान फुलसौंदर

 यशची कामगिरी अभिमानास्पद अशीच- भगवान फुलसौंदर

जलतरणपटू निल शेकटकर याचा संकल्प ग्रुपच्यावतीने सत्कार


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः मुलांमध्ये अनेक सुप्त गुण असतात, त्या गुणांना वाव दिल्यास आपल्या कर्तुत्वाने सर्वांचेच नाव मोठे करत असतात. आज अनेक स्पर्धांमधून या मुलांच्या कला-गुणांना वाव मिळत आहे. निल शेकटकर याने  वेगळ्या क्षेत्रात आपल्या मेहनतीने अशक्य अशी गोष्ट केली आहे. त्याने थेट समुद्रात पोहून जो उच्चांक गाठला त्यांच्या यशाचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. त्यांची ही धडपड त्याला या क्षेत्रात वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवेल. त्याने केलेली कामगिरी ही अभिमानास्पद अशीच आहे, असे प्रतिपादन  माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी केले.
जलतरणपटू निल सचिन शेकटकर याने ऐलिफंटा ते गेट ऑफ इंडिया हे 14 कि.मी.चे अंतर 2 तास 45 मिनिटात पोहून पूर्ण केले. त्याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद घेण्यात आली. त्याबद्दल त्याचा संकल्प ग्रुपच्यावतीने सत्कार माजी महापौर भगवान फुलसौंदर व शहरप्रमुख दिलीप सातपुते यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी माजी उपमहापौर अनिल बोरुडे, सुनिल राऊत, प्रदीप बोरुडे, विष्णू फुलसौंदर, विजय पुंड, धनंजय फुलसौंदर, सचिन शेकटकर आदि उपस्थित होते. याप्रसंगी दिलीप सातपुते म्हणाले, चि.निल शेकटकर याने 11 व्या वर्षीच मिळविलेले यश हे अचंबित करणारे आहे. मुलांच्या कर्तुत्वाचा अभियान हा आई-वडिलांना असतो, तसा शहरालाही असतो. त्यांचे हे यश नगर शहराचे नाव उंचविणार आहे, असे सांगून त्याच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी सचिन शेकटकर यांनी चि.निल याने विविध स्पर्धांत मिळविलेल्या यशाची माहिती दिली. सुनिल राऊत यांनी सर्वांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment