नागरिकांच्या हितासाठी नेहमीच भाजपा काम करत असतो - माजी महापौर वाकळे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 17, 2021

नागरिकांच्या हितासाठी नेहमीच भाजपा काम करत असतो - माजी महापौर वाकळे

 नागरिकांच्या हितासाठी नेहमीच भाजपा काम करत असतो - माजी महापौर वाकळे

नगरी दवंडी/प्रिंतनिधी


अहमदनगर ः
स्थानिक नगरसेवक व नगरसेविका आशाताई कराळे यांच्या प्रयत्न व पाठपुराव्याने प्रभाग 5 मध्ये हे काम होत आहे. प्रभाग 5 मध्ये कधी नव्हे ते एवढे कामे होणार आहेत. शासनाचा 5 कोटीचा निधीच्या माध्यमातून  प्रत्येक प्रभाग व कॉलनीत आरोग्यकेंद्र, सभामंडप, पिण्याचे पाण्याची लाईन, रस्ते असे विविध कामे होणार आहेत. 80 लाख रूपयाचा असा सुसज्ज रस्ताही होणार आहे. प्रोफेसर कॉलनी ते भिस्तबाग रस्ता असा 3 कोटी भरीव व मोठी कामे पक्षाच्या माध्यमातून माझ्या काळात केली आहेत व करत आहोत. नागरिकांच्या हितासाठी नेहमीच भाजपा काम करत असतो.असे प्रतिपादन माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले.वॉर्ड क्रं. 5 मध्ये प्रोफेसर कॉलनी येथील भाग्योदय सोसायटी व विनायक पार्क येथील पिण्याच्या पाण्याची  पाईपलाईनचा शुभारंभ माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भाजप जिल्हा अध्यक्ष महेद्र उर्फ भैय्या गंधे, स्थानिक नगरसेवक आशाताई कराळे, मनोज दुल्लम, मनोज ताठे, अरूण शिंदे, प्रदिप गिते, सुरेश क्षिरसागर, भिमराव काकड, दौलतराव गिरमे, अशोक सरनाईक आदीसह परीसरातील नागरिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment