मदत नव्हे तर मी कर्तव्य केले- आ. जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, August 16, 2021

मदत नव्हे तर मी कर्तव्य केले- आ. जगताप

 मदत नव्हे तर मी कर्तव्य केले- आ. जगताप

तपोवन रोडवरील आगीत भस्मसात झालेल्या दुकानदारांना मदतीचा हात


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः व्यापारी व व्यावसायिक हे समाजातील एक महत्त्वाचा घटक आहे.एकमेकांवर विविध व्यवसाय अवलंबून असतात यावरच रोजगार उपलब्ध होत असतो, कोरोनाच्या संकटाच्या काळामध्ये व्यापार्‍यांनी व व्यवसायिकांनी एक महत्त्वाची भूमिका बजावत गरजवंतांना मदतीचा हात दिला. विविध प्रश्न सोडविण्यासाठी संघटना स्थापन करणे गरजेचे आहे. सावेडी उपनगरातील व्यापारी संघटनेने तपोवन रोडवरील नुकत्याच घडलेल्या आगीच्या दुर्घटन बाबत नुकसानग्रस्तांना मदतीचा हात दिला. मी आर्थिक मदत नव्हे तर मी माझे कर्तव्य पार पाडले आहे अशीच एकजूट अशीच जर सर्वांनी ठेवली तर उध्वस्त झालेले कुटुंब उभे राहण्यास मदत होणारच असे प्रतिपादन प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.
सावेडी उपनगर व्यापारी असोसिएशनच्या वतीने तपवन रोड वरील आगीत भस्मसात झालेल्या व्यावसायिकांना आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द करताना आ.संग्राम जगताप समवेत विरोधी पक्षनेता संपत बारस्कर,अध्यक्ष पै.शिवाजी चव्हाण, उपाध्यक्ष संतोष भोजने, प्रमोद डोळसे, केतन बाफना, नंदू शिवगजे, यश शहा, मंगेश निसळ, संकेत शिंगटे, हभप खोसे महाराज, रंजना उकिरडे, शिवाजी कराळे, संतोष कल्याणकर, शेखर शिंदे, देविदास डहाळे, हरिदास नागरे, सोमनाथ कराड आदी सह व्यपारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना संघटनेच्या अध्यक्षपदी पै.शिवाजी चव्हाण म्हणाले की, कोरोनाच्या काळामध्ये व्यवसायिक मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे, तपोवन रोडवरील 5 व्यवसायिकांची दुकाने आगीत भस्मसात होवून यात व्यावसायिकांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले त्यामुळे मोठी आर्थिक हानी झाली आहे. अशा व्यावसायिकांना मदतीचा हात देणे हे आपल्या संघटनेचे प्रथम कर्तव्य आहे, याच भावनेतून सावेडी उपनगरातील सर्व व्यापार्‍यांनी एकत्रित येऊन आर्थिक मदत गोळा केली या व्यावसायिकांना पुन्हा आपला व्यवसाय उभा करण्यासाठी आम्ही खारीचा वाटा उचलला आहे तसेच शहराचे आमदार संग्राम जगताप हे व्यापारी व  व्यावसायिकांच्या संकट काळामध्ये बरोबर असतात याच माणुसकीच्या भावनेतून प्रत्येक दुकानदाराला अकरा हजार रुपयेची आर्थिक मदत जाहीर करून दिली आहे असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment