नगर तालुका भाजपाच्या वतीने डॉ. श्याम प्रसाद मुखर्जी समर्थ बुथ अभियानानिमित्त बैठक संपन्न - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, August 16, 2021

नगर तालुका भाजपाच्या वतीने डॉ. श्याम प्रसाद मुखर्जी समर्थ बुथ अभियानानिमित्त बैठक संपन्न

 नगर तालुका भाजपाच्या वतीने डॉ. श्याम प्रसाद मुखर्जी समर्थ बुथ अभियानानिमित्त बैठक संपन्न


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः बुथचे नियोजन करताना युवकांना सहभागी करून घ्यायचे आहे त्यांना पुढे घेऊन संधी दया. प्रत्येक बुथ समर्थ करायचे आहे. प्रत्येक घटकापर्यत पोहचून पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी सर्व सामन्य जनतेसाठी केंद्र सरकार मार्फत राबविलेल्या  कामाचा लेखाजोखा सादर करायचा आहे. यासाठी टिम तयार करायच्या सूचना भाजपचे उत्तर महाराष्ट्राचे  विभागीय संघटन मंत्री उत्तर रवीजी अनासपुरे यांनी भाजप कार्यकर्त्याना दिल्या.
डॉ. श्याम प्रसाद मुखर्जी समर्थ बुथ अभियान अंतर्गत नगर तालुका येथे बैठक आयोजीत करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचा अध्यक्ष स्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे होते. या कार्यक्रमासाठी आ. बबनराव पाचपुते, मा. आ. शिवाजी कर्डीले, प्रा. भानुदास बेरड, अशोक खेडकर, तालुका अध्यक्ष मनोज कोकाटे, सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के, जिल्हा सरचिटणीस दिलीप भालसिंग, रेवणनाथ चोभे, हरीभाऊ कर्डीले, बबनराव आव्हाड, बाबा काळे, श्यामराव पिंपळे, बाबासाहेब खर्से, रभाजी सूळ, दिपक कार्ले, श्रीकांत जगदाळे, उद्धव कांबळे, बाबासाहेब जाधव, संतोष कुलट, प्रंशात गहिले, शुभम भांबरे, रामदास सोनवणे, दिपक लांडगे, रमेश पिंपळे, अंजना येवले  यावेळी उपस्थित होते. यावेळी अनासपुरे म्हणाले प्रत्येक वयोगटाचे वर्गीकरण करा या अभियानात जास्तीत जास्त तरुणांना सभासद करून घ्या. आठ दिवसात बुथ रचना तयार करा, बुथ प्रमुखाच्या बैठका घ्या, बुथ मजबुत करा अश्या सूचना यावेळी दिल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here