सुनिल कदम यांना कोरोना योद्धा जागतिक पुरस्कार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 24, 2021

सुनिल कदम यांना कोरोना योद्धा जागतिक पुरस्कार

 सुनिल कदम यांना कोरोना योद्धा जागतिक पुरस्कार

खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या हस्ते सन्मान


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः  डॉक्टर सुनिल कदम यांनी कोव्हिड 19 मध्ये कार्यरत राहून सामाजिक कामांच्या माध्यमातून जी वैद्यकीय सेवा केली ती कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले आहे.
निघोज येथील वात्सल्य हॉस्पिटलचे संस्थापक अध्यक्ष डॉ सुनिल विष्णू कदम यांना लंडन येथील जागतिक सामाजिक संस्थेने कोव्हिड 19 योद्धा म्हणून पुरस्कार दिल्याबद्दल निघोज ग्रुप ग्रामपंचायत, संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशन व ग्रामस्थ यांच्यावतीने त्यांना खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या हस्ते सन्मानित करून त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सभापती गणेश शेळके, युवा नेते राहुल शिंदे पाटील, संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ, राळेगण थेरपाळचे सरपंच पंकज कारखिले,विष्णूशेठ कदम,शिवराज कदम, ग्रामपंचायत सदस्य मंगेश वराळ, अस्लमभाई इनामदार,  पारनेर तालुका प्रेस फोटोग्राफर संघटनेचे पदाधिकारी जयसिंग हरेल, बाळासाहेब जगताप,किरण गायकवाड आदी उपस्थित होते.
खासदार विखे पाटील म्हणाले गेली 16 वर्षात बालरोग तज्ञ म्हणून डॉ.कदम यांनी निघोज व परिसरातील ग्रामीण भागातील बालकांना उपचार करीत सामाजिक सेवाभाव जपण्याचे काम केले आहे.कोव्हिड 19 कार्यकाळात हॉस्पिटल सातत्याने सुरू ठेउन सामाजिक कामांच्या माध्यमातून समाजाभिमुख काम केले आहे.म्हणून लंडन येथील वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड संस्थेने दखल घेत त्यांना कोव्हिड योद्धा म्हणून पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.पारनेर तालुक्याच्या दृष्टीने ही अभिमानास्पद बाब असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ विखे पाटील यांनी व्यक्त केले आहे.
यावेळी खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांचा कदम परिवाराच्या वतीने विष्णूशेठ कदम व संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

No comments:

Post a Comment