मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना केंद्रीय मंत्री राणेंचे अपशब्द, शिवसेना आक्रमक... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 24, 2021

मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना केंद्रीय मंत्री राणेंचे अपशब्द, शिवसेना आक्रमक...

 मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना केंद्रीय मंत्री राणेंचे अपशब्द, शिवसेना आक्रमक...

शहर कोतवाली पोलिस ठाण्यात...राणेवर गुन्हा दाखल.
भाजपा कार्यालयासमोर...प्रतिमेचे दहन.




नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कानशिलात लगावण्याचं वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत. राज्यात सर्वत्र शिवसेना आक्रमक झाली आहे. त्यांच्या  वक्तव्यामुळे राज्यातील वातावरण तापलं आहे. मुख्यमंत्र्यांना अपशब्द वापरल्यामुळे महाराष्ट्रामध्ये राणेंविरोधात ठिकठिकाणी गुन्हे दाखल होत आहेत. राणेंवर गुन्हा दाखल करण्यासाठी शहरातील कोतवाली पोलिस ठाण्यात शिवसैनिकांनी गर्दी केली. कोतवाली पोलिसांनी राणे यांच्यावर भादवि कलम 500/505/ 2 नुसार गुन्हा दाखल केला आहे. शहरातील भाजपा कार्यालयासमोर राणे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यांच्या प्रतिमेस जोडे मारून त्यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मी असतो तर कानशिलात मारली असती असे जहाल वक्तव्य आल्यानंतर शिवसेना आक्रमक झाली असून राज्यात राणे यांच्याविरोधात शिवसेनेच्या युवा शाखेकडून ठिकठिकाणी गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. जनाशीर्वाद यात्रे दरम्यान काल महाड मधे राणे यांनी ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर चिपळूण, नाशिक, पुणे याठिकाणी राणें विरोधात गुन्हे दाखल असून त्यानंतर अहमदनगर मधे शिवसेनेचे पदाधिकारी  यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्रदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणात काहीशी झालेल्या गफलतीवर केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी अशा चुकीबद्दल मी कानशिलात लगावली असती, देशाला स्वातंत्र्य मिळून किती वर्षे झाली, स्वातंत्रदिनाचे हे अमृतवर्षं आहे की हिरक वर्षे आहे हे ठाकरे यांना माहिती नाहीत, मी असतो तर कानशिलात लगावली असती असे वक्तव्य नारायण राणे यांनी महाड मध्ये पत्रकारपरिषदेत केले होते. राणें कडून असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांबाबत आल्यानंतर शिवसेना आक्रमक झाली आहे.
यावेळी महापौर रोहिणी शेंडगे, शहर प्रमुख दिलीप सातपुते, युवा सेना जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड, माजी शहर प्रमुख संभाजी कदम माजी महापौर भगवान फुलसोंदर, जेष्ठ नगरसेवक अनिल शिंदे, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, अभिषेक कळमकर, गणेश कवडे स्मिता अष्टेकर, आशा निबाळकर, संजय शेंडगे, शाम नळकांडे, प्रशांत गायकवाड, दीपक खेरे, सचिन शिंदे,  संग्राम कोतकर, अमोल येवले संतोष गेनपा, दत्ता जाधव, विशाल वालकर, काका शेळके, मृणाल भिगारदिवे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment