पदाच्या माध्यमातून वेगळा ठसा उमटवतील- अविनाश घुले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, August 2, 2021

पदाच्या माध्यमातून वेगळा ठसा उमटवतील- अविनाश घुले

 पदाच्या माध्यमातून वेगळा ठसा उमटवतील- अविनाश घुले

बाजार समितीचे नूतन सहसचिव सचिन सातपुते यांचा हमाल पंचायतीच्यावतीने सत्कार


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगरची कृषी उत्पन्न बाजार समितीने आपल्या कार्याने राज्यात लौकिक मिळविला आहे. त्यात बाजार समितीचे संचालकांबरोबरच तेथील अधिकारी, कर्मचार्यांचाही वाटा आहे. शेतकरी, व्यापारी, हमाल यांच्यात समन्वयातून बाजार समितीचे कामकाज उत्कृष्टपणे सुरु आहे. नव्याने नियुक्त झालेले सहसचिव सचिन सातपुते यांची कामाबाबत हातोटी असून, या पदाच्या माध्यमातून ते सर्वांना न्याय देतील. बाजार समितीच्या उन्नत्तीसाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक आहेत. त्यात सचिन सातपुते आपल्या कामाने वेगळा ठसा उमटवतील. त्याचप्रमाणे हमाल मापाडी यांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देतील, असा विश्वास हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनश घुले यांनी केले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सहसचिवपदी सचिन सातपुते यांची निवड झाल्याबद्दल जिल्हा हमाल पंचायतच्यावतीने त्याचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अविनाश घुले, उपाध्यक्ष गोविंद सांगळे, सचिव मधुकर केकाण, सचिन ठुबे, रविंद्र भोसले, रामा पानसंबळ, रत्नाबाई आजबे, बाबा काळे, सोमनाथ थिटे, मनोज गुंड, दिगंबर कर्डिले, तबाजी कार्ले आदि उपस्थित होते.
याप्रसंगी सचिन सातपुते म्हणाले, बाजार समिती उत्कृष्टपणे काम करत असून, सर्वांच्या सहकार्याने बाजार समितीचे नाव राज्यात आदर्शवत असे आहे. यापुढेही असेच काम बाजार समितीचे राहिल. संचालक, व्यापारी आणि हमाल यांच्यामध्ये ताळमेळ घालून बाजार समितीच्या लौकिकात भर टाकण्याचा आपला प्रयत्न राहील. सर्वांनी केलेल्या सत्कारामुळे आपणास प्रोत्साहन मिळणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी उपाध्यक्ष गोविंद सांगळे यांनी हमाल पंचायतच्या कार्याचा आढावा घेऊन नूतन सहसचिव सचिन सातपुते यांना शुभेच्छा दिल्या. शेवटी सचिव मधुकर केकाण यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here