पारनेर येथील तहसीलदारांच्या बेकायदेशीर संपत्तीची चौकशी करावी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, August 25, 2021

पारनेर येथील तहसीलदारांच्या बेकायदेशीर संपत्तीची चौकशी करावी

 पारनेर येथील तहसीलदारांच्या बेकायदेशीर संपत्तीची चौकशी करावी

अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेची माहिती


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः येथील भ्रष्ट तहसीलदार यांची बेकायदेशीर संपत्तीची चौकशी करावी त्यांच्याबद्दल खूप तक्रार असूनही कोणतीही कार्यवाही होत नाही आणि त्यांनी स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी लोकप्रिय आमदार जे समाजाची अहोरात्र सेवा करतात असे आमदार निलेश लंके यांच्यावर बिनबुडाचे आरोप लाऊन स्वत:चा भ्रष्टाचार लपवण्याचा प्रयत्न करत आहे..
आज ज्या माणसाचा देशाच्या बाहेरून गौरव होत आहे.. त्या माणसाच्या बदनामी साठी राजकीय षडयंत्र रचुन त्यांना बदनाम करण्यात येत आहे.. अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटन हे कोणत्याही गैर प्रकार करण्यार्‍या माणसाला साथ देणार नाही.. पण आज जो आमदार समाजसेवा करतो त्यालाच बदनाम करायचा प्रयत्न चालू आहे तो थांबवा आणि तात्काळ बदनामी करणार्‍या तहसीलदार यांना निलंबित करून कार्यवाही करावी असे निवेदन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना देण्यात आले. त्यांनी जर तात्काळ कार्यवाही नाही केली तर छावा स्टाइल आंदोलन छेडण्यात येईल..असे राज्य संघटक अशोक चव्हाण यांनी त्या निवेदनाद्वारे इशारा दिला..
तसेच यावेळी महिला जिल्हाध्यक्ष सुरेखा ताई सांगळे.. जिल्हा सचिव गणेश गायकवाड, कामगार नेते रावसाहेब काळे, नगर तालुकाध्यक्ष किरण फटांगरे, अनिकेत आवारे, संकेत चव्हाण, सौरभ पवार, किशोर येळवंडे, रोहित वाघ, मोइम शेख ,भूषण शिंदे व छावा पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment