बॉलिवूड अभिनेत्री मलिशा हिना खानने तालिबान गोळीबारात गमावले 4 नातेवाईक. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, August 25, 2021

बॉलिवूड अभिनेत्री मलिशा हिना खानने तालिबान गोळीबारात गमावले 4 नातेवाईक.

 बॉलिवूड अभिनेत्री मलिशा हिना खानने तालिबान गोळीबारात गमावले 4 नातेवाईक.

‘भारतात असल्यामुळे सुरक्षित....’ अभिनेत्रीने मानले आभार..मुंबई :
अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता स्थापन झाल्यानंतर धक्कादायक घडामोडी समोर येत आहेत. अफगाणिस्तानमधून रोज फोटो आणि व्हिडिओ समोर येत असतात. आता बॉलिवूडमध्ये काम करणार्‍या एका अभिनेत्रीचे एक -दोन नव्हे तर चार नातेवाईकांनी तालिबान झालेल्या गोळीबारामुळे आपले प्राण गमावले आहेत. पाकिस्तानी-अफगाण वंशाची अभिनेत्री मलिशा हिना खानने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून स्वत: ला भाग्यवान म्हटलं आहे.
अभिनेत्री मलिशा हिना खानने सोशल मीडियावर माहिती दिली आहे की तिचे काका, पुतणे आणि दोन चुलत भाऊ या गोळीबारात मारले गेले. मालिशाच्या कुटुंबातील जवळपास  6 जण अद्यापही अफगाणिस्तानमध्ये अडकले आहेत. ज्यामध्ये तिचा छोटा भाऊ आणि बहिण आहे. ते अफगाणिस्तानमध्ये लपून बसले आहेत.
मलिशा गेल्या काही वर्षांपासून भारतात आहे. मलिशाबद्दल सांगायचं झालं तर ती न्यूड व्हिडिओमुळे चर्चेत आली होती. 2018 साली न्यूड व्हिडिओ लीक झाल्यावर गायकाला पाठिंबा दिला. मालिशाने प्रसिद्ध पाकिस्तानी गायिका राबी पिरजादाला पाठिंबा दिला, जिचे खाजगी न्यूड फोटो आणि व्हिडिओ लीक झाले होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here