बेमुदत काम बंद आंदोलनाने जिल्ह्यातील 14 लाख जनावरांचे आरोग्य धोक्यात. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 3, 2021

बेमुदत काम बंद आंदोलनाने जिल्ह्यातील 14 लाख जनावरांचे आरोग्य धोक्यात.

 बेमुदत काम बंद आंदोलनाने जिल्ह्यातील 14 लाख जनावरांचे आरोग्य धोक्यात.

पशुसंवर्धन आयुक्तांचे मागण्यांकडे दुर्लक्ष...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः पशुचिकित्सा व्यवसायीकाच्या विविध मागण्यांसाठी 1 ऑगस्टपासून पशु चिकित्सा व्यावसायिक संघटनेने बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केल्याने राज्यासह नगर जिल्ह्यातील पशु वैद्यकीय सेवेवर परिणाम झाला असून जनावरांचे आरोग्य धोक्यात आले असून जनावरांच्या डॉक्टरांच्या काम बंद मुळे एकट्या नगर जिल्ह्यात 14 लाख 50 हजार पशुधनाच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या आंदोलनाला खासगी जनावरांचे डॉक्टरांचा पाठींबा असल्याने आंदोलनातून लवकरात मार्ग काढण्याची गरज निर्माण झाली आहे.
पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने विविध मागण्यांसाठी 15 जूनपासून वेगवेगळ्या टप्प्यात असहकार आंदोलन  सुरू केलेले होते. मात्र, या आंदोलनाकडे पशुसंवर्धन आयुक्तांनी दुर्लक्ष केल्याने संतप्त झालेल्या पशुचिकित्सा व्यवसायी संघटनांनी आंदोलनाचे हत्यार बाहेर काढले आहे.
आंदोलनाबाबत बोलताना संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.बाळासाहेब सोनावळे यांनी सांगितले की, पशुधन विकास अधिकारी गट अ सेवाप्रवेश नियमात सुधारणा करणे, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) गट अ पंचायत समिती या पदनामात बदल करून तालुका पशुसंवर्धन अधिकारी गट अ पंचायत समिती करू नये, पशुधन पर्यवेक्षक संवर्गातील कर्मचार्यांना देण्यात आलेल्या तिसर्या कालबद्ध पदोन्नतीच्या वेतन निश्चितीत सुधारणा करावी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांच्या धर्तीवर संवर्गातील कर्मचार्यांना दरमहा वेतनातून कायम प्रवास भत्ता मंजूर करावा, पदवीका प्रमाणपत्र धारकांची अर्हता भारतीय पशुवैद्यक परिषद कायदा 1984 च्या पहिल्या अनुसूचित समाविष्ट करून शासन अधिसूचना 27 ऑगस्ट 2009 रद्द करून सुधारित अधिसूचना काढावी यासह अन्य मागण्यांसाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र, पशुसंवर्धन विभागाकडून जनावरांच्या डॉक्टरांच्या आंदोलनाकडे गांभीर्याने पाहिले नाही. त्यामुळे आता पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले. या आंदोलनात राज्यातील 2 हजार 853 पशु आरोग्य संस्थांमधील 4 हजार 500 पशुचिकित्सा व्यवसायी सहभागी झाले असून खासगी पशु वैद्यकीय सेवा पुरविणार्या जनावरांच्या डॉक्टरांनी आंदोलनाला पाठींबा दिला आहे.
पशूसंवर्धन विभागाने संघटनेच्या मागणीचा विचार करून आंदोलन करण्याची वेळ येऊ द्यायला नको होती, अशी भावना संघटनेचे नगर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोनावळे, सरचिटणीस डॉ.नितिन निर्मळ,कार्याध्यक्ष डॉ.संजय कढणे, माजी जिल्हाध्यक्ष डॉ.सुधाकर लांडे, कोषाध्यक्ष डॉ.गंगाधर निमसे यांनी व्यक्त केली आहे.

No comments:

Post a Comment