कोविडचा काळ हा जनतेला वेदना देणारा ठरला- आ. जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, August 18, 2021

कोविडचा काळ हा जनतेला वेदना देणारा ठरला- आ. जगताप

 कोविडचा काळ हा जनतेला वेदना देणारा ठरला- आ. जगताप

कोविडमुळे मृत्यू झाल्याने सुपरवायझरच्या कुटुंबीयांना 1 लाख 20 हजारांची मदत


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोरोनाचा महाभयंकर संकट काळ हा आपल्याला वेदना देणारा ठरला आहे. या काळामध्ये कोरोना संसर्ग विषाणूमुळे काहींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, त्यामुळे अनेक कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या काळामध्ये प्रत्येकाला धीर व आधार देण्याची खरी गरज आहे. एम.आय.डि.सी येथील भारत इंडस्ट्रियल कंपनीने सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम केले आहे, आपल्या कंपनीमध्ये काम करणारा सुपरवायझर सचिन वामन याचा कोरोना विषाणूने दुर्दैवी मृत्यू झाला आहे त्याच्या कुटुंबीयांचा आधार हरपला यामुळे कुटुंबियांवर मोठे संकट ओढवले आहे अशातच कंपनीने त्याच्या कुटुंबीयांना 1 लाख वीस हजार रुपयांची आर्थिक मदत देऊन कर्तव्याची भावना पार पाडली असल्याचे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.
भारत इंडस्ट्रियल कंपनीमधील सुपरवायझर सचिन वामन याचा कोरोना विषाणू मुळे दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्या कुटुंबीयांना कंपनीच्या वतीने 1 लाख 20 हजारा रुपयाचा आर्थिक मदतीचा धनादेश त्यांच्या पत्नी अश्विनी वामन यांच्याकडे सुपूर्त करताना आ.संग्राम जगताप समवेत कंपनीचे संचालक विनय पूरस्वानी, मयूर कुलथे,सुरेश बनसोडे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना कंपनीचे संचालक विनय पूरस्वानी म्हणले की,कोरोनाच्या महाभयंकर संकटा मुळे अनेक कुटुंबाचे आधार गमावले आहे. सचिन वामन हा आमच्या कंपनीतील एक प्रामाणिक व कष्टाळू सहकारी होता. त्याचा कोविड मुळे दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्या कुटुंबीयांना आधार देणे हे आपले कर्तव्य आहे, याच भावनेतून त्याच्या पत्नी अश्विनी वामन यांना 1 लाख 20 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे.आ.संग्राम जगताप यांनी कोविड काळात एक महत्त्वाची भूमिका बजावत अनेक कोरोना रुग्णांना उपचार व औषधे मिळवून देण्यासाठी काम केले आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना जीवदान मिळाले आहे त्यांच्या कार्याने आम्ही प्रेरित होऊन आपले कर्तव्य पार पाडत आहे असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment