‘मांडूळ’ तस्करी करणारा, एक आरोपी गजाआड... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, August 18, 2021

‘मांडूळ’ तस्करी करणारा, एक आरोपी गजाआड...

 ‘मांडूळ’ तस्करी करणारा, एक आरोपी गजाआड...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
कर्जत ः तालुक्यातील नवसरवाडी  येथे मांडूळाची तस्करी करणार्‍या एकाला वनपरिक्षेत्र विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. कारवाई दरम्यान तीन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. पथकाने मांडूळासह मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल केला.दि. 16 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास श्रीगोंदा  येथील वनसंरक्षक रमेश देवखिळे यांनी कर्जत तालुक्यातील नवसरवाडी येथे वन्यजीव मांडूळाची तस्करी होण्याची शक्यता असल्याची गोपनिय दिली. माहिती मिळाल्याने वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश छबिलवाड, वनरक्षक सुरेश भोसले, आजिनाथ भोसले, दिपक गवारी, वनमजूर किसन नजन यांनी खासगी गाडीने साध्या वेशात नवसरवाडी येथे गेले.
घटनेची खात्री करण्यासाठी बनावट गिन्हाईक म्हणून संबंधीत इसमांकडे गेल्यानंतर 4 व्यक्तींकडे 1 मांडूळ असल्याची खात्री झाली.   त्यांना ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे सात लाख रुपये रक्कम देण्याचे मान्य केले. त्या अज्ञात 4 व्यक्तीपैकी दोघांनी घरी जाऊन एक मांडूळ आणले. मुद्देमाल मांडूळ व आरोपी यांची खात्री होताच आरोपी विशाल सुर्यभान धनवटे, वय 25 वर्षे, रा. नवसरवाडी ता. कर्जतव मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.
वनकर्मचार्‍यांनी मांडूळाचे वजन केले असता ते 1.15 किलो वजनाचे आढळून आले. पुढील तपास उपवनसंरक्षक सुवर्णा माने व सहाय्यक वनसंरक्षक रमेश देवखिळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरीक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) गणेश छबिलवाड, वनरक्षक सुरेश भोसले, आजिनाथ भोसले, किशोर गांगर्डे, दिपक गवारी व वन कर्मचारी करीत आहेत.

No comments:

Post a Comment