आ. निलेश लंके, विक्रम राठोड उचलणार 70 विद्यार्थ्यांचा डॉक्टर होण्याचा खर्च. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, August 5, 2021

आ. निलेश लंके, विक्रम राठोड उचलणार 70 विद्यार्थ्यांचा डॉक्टर होण्याचा खर्च.

 आ. निलेश लंके, विक्रम राठोड उचलणार 70 विद्यार्थ्यांचा डॉक्टर होण्याचा खर्च.

राष्ट्रवादीच्या आमदारांने साजरा केला स्व शिवसेना नेते अनिल राठोडांचा स्मृतिदिन.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः स्व माजी आमदार अनिल राठोड हा गरिबांच्या प्रश्नांसाठी धावून जाणारा नेता होता. या शिवसेना नेत्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त ज्या विद्यार्थ्यांना डॉक्टर बनण्यासाठी वैद्यकीय शिक्षण घ्यायचे आहे. अशा 70 विद्यार्थ्यांचा खर्च लंके प्रतिष्ठान व विक्रम राठोड यांचे तर्फे करण्यात येईल असे प्रतिपादन आ. निलेश लंके यांनी व्यक्त केले.
माजी मंत्री स्व.अनिल राठोड यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्या पुर्णाकृती तैलचित्राचे अनावरण आमदार निलेश लंके यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. राजकीय जी
वनात स्व.अनिल राठोड यांचे मार्गदर्शन आपणास सातत्यांने मिळत असे ही ते म्हणाले. याप्रसंगी विक्रम राठोड म्हणाले, आज स्व.अनिल राठोड यांना अभिप्रेत असलेले कार्य असेच पुढे चालू ठेवून गोर-गरिबांच्या शिक्षणाकरीता शिवसेना पाठिशी राहिल. स्व.राठोड यांना गोर-गरीबांचे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवितांना काळ-वेळेच भान नसायचे. 24 तास उपलब्ध असलेला आमदार म्हणून त्यांची ख्याती होती. हीच परंपरा नगर शिवसेना पुढे चालू ठेऊ. पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी शुभंकर कांबळे यांनी तयार केलेल्या तैलचित्राचे अनावर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी माजी आमदार दिपक पायगुडे, विक्रम राठोड, महापौर रोहिणी शेंडगे, संभाजी दहातोंडे, बाळासाहेब बोराटे, अभिषेक कळमकर, संजय शेंडगे, सतीश मैड, मदन आढाव, गिरिष जाधव, दत्ता जाधव, परेश लोखंडे दिवसभरात शिवालय येथे शिवसेना संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर, स्नेहालयाचे गिरिष कुलकर्णी, सुहास मुळे, सुवेंद्र गांधी, किरण काळे, राजेंद्र गांधी, नगरसेवक नज्जू पहिलवान, माजी महापौर भगवान फुलसौंदर, सुरेखा कदम, संभाजी कदम, अनिल बोरुडे, गणेश कवडे, सचिन शिंदे, संग्राम कोतकर, बबलू शिंदे, स्मिता अष्टेकर, आशा निंबाळकर, राजेंद्र दळवी, पारुनाथ ढोकळे, अमोल ठाकूर, अर्जुन दातरंगे, अंबादास शिंदे, सुरेश तिवारी, अशोक दहिफळे, सुनिल लालबोंद्रे, रवी लालबोंद्रे, अरुणा गोयल आदिंसह शिवसेनेचे नगरसेवक पदाधिकारी आदिंसह विविध पक्षाचे, संघटनांच्या मान्यवरांनी भेट देऊन अभिवादन केले.

No comments:

Post a Comment