मनपाची बिग बाजारवर कारवाई, 25 हजारांचा दंड. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, August 2, 2021

मनपाची बिग बाजारवर कारवाई, 25 हजारांचा दंड.

 मनपाची बिग बाजारवर कारवाई, 25 हजारांचा दंड.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः मनपाच्या पथकामार्फत गर्दी करून कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर दररोज कारवाही करून दंड वसूल केला जात आहे. तरीही अद्याप शहरातील बाजारपेठा दुकानातील गर्दी कमी झालेली नाही काल सुट्टीच्या दिवशी शहरातील पथकांनी 37 हजारांचा दंड वसूल केला असून शहरात अजूनही नागरिक बेफिकीर पने फिरताना दिसून येत आहे.
काल नगर शहरातील नगर-मनमाड महामार्गावर असलेल्या बिगबाजार हे शोरूम सर्रासपणे उघडे असल्याचे महानगर पालिकेच्या पथकाला लक्षात आल्यानंतर आज दक्षता पथकाचे प्रमुख शशिकांत नजर यांच्या अधिपत्याखाली बिग बाजार या शॉप वर नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 25 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
नगर शहरातील मनमाड महामार्ग असलेले बिग बाजार हे शनिवार, रविवार दोन दिवस सुरू होते. आज रविवार असल्यामुळे गर्दी सध्या मोठ्या प्रमाणात होती, महानगरपालिकेच्या दक्षता पथकाला याची माहिती मिळाल्यानंतर महानगरपालिकेचे दक्षता पथक तात्काळ बिग बाजार या ठिकाणी पोहोचले या ठिकाणी अनेक जण मालक खरेदी करत असल्याचे आढळून आले. या प्रकरणात संदर्भामध्ये या मॉल चे व्यवस्थापन यांनी याठिकाणी आम्ही मालक विक्री करतो असे सांगितले वास्तविक पाहता बंदच्या काळामध्ये अस्थापना सुरू ठेवू नका असे आदेश असताना आपण त्यात काय चालू ठेवल्या असच जागा सुद्धा या पथकाने विचारला त्यानंतर पथकान.25000 दंडात्मक कारवाई यावेळी केली. तर पाईपलाईन रोड या ठिकाणी अमोल नावाने जे स्टोअर होते ते सुद्धा सुरू असल्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे
या संदर्भामध्ये दक्षता पथकाचे प्रमुख शशिकांत नजान यांनी आम्ही शहरांमध्ये विविध प्रकारच्या कारवाया करत असतो गेल्या आठवडाभर मध्ये अनेक ठिकाणी आम्ही कारवाई केलेल्या होत्या, आज बिग बजार हा मॉल शनिवार, रविवार सुद्धा सुरू होता त्यामुळे नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आम्ही त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली असल्याचे सांगितले.
सदरची कारवाई शशिकांत नजन दक्षता विभागाचे प्रमुख, अमोल लहारे, भास्कर आकु बत्तीन,अनिल आढाव, राहुल साबळे, अजय कांबळे, राहुल शेंडे, बबन काळे, राजू जाधव, बबन काळे,ऋषिकेश लखश्रपती, मांज्याबापू लहारे, परशुराम नागपुरे, कोलते, यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

No comments:

Post a Comment