बॉक्सिंग स्पर्धा भरवणार्‍या भाजपा पदाधिकार्‍यांवर गुन्हा दाखल. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, August 2, 2021

बॉक्सिंग स्पर्धा भरवणार्‍या भाजपा पदाधिकार्‍यांवर गुन्हा दाखल.

 बॉक्सिंग स्पर्धा भरवणार्‍या भाजपा पदाधिकार्‍यांवर गुन्हा दाखल.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शासन नियमाप्रमाणे शनिवार-रविवार लॉकडाऊन आहे त्याचे तंतोतंत पालन करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले असतानाही काल नगर शहरातील सावेडी भागातील हुंडेकरी लॉनच्या पाठीमागे असलेल्या बंधन लॉन येथे काल विनापरवाना बॉक्सिंग स्पर्धेसाठीच्या निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते तोफखाना पोलिसांनी या ठिकाणी जाऊन तिघांविरुद्ध जिल्हाधिकार्‍यांचे आदेश भंग करणे व प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
रविवारी सकाळी नितीन शिवाजी शेलार (रा. लेखानगर) लखन बबन शिंदे, महेंद्र मच्छिंद्र कुसळकर (रा. सावेडी) यांनी अ‍ॅमेचर स्पोर्ट किक बॉक्सिंग स्पर्धेची निवड चाचणी आयोजित केली होती त्या ठिकाणी सुमारे 50 ते 60 खेळाडू व पंच यांना एकत्रित जमा केले असल्याची माहिती तोफखाना पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक किरण सुरसे यांना मिळाली होती. त्यानुसार सुरसे व कर्मचारी तेथे गेले असता आयोजकांकडे स्पर्धेसाठी परवानगी नसल्याचे समोर आले या प्रकरणी पोलिसांनी वरील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.

No comments:

Post a Comment