जामखेड व्यापारी आसोसिएशनचे दुकाने बंद न ठेवण्याबाबत तहसील येथे निवेदन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, August 13, 2021

जामखेड व्यापारी आसोसिएशनचे दुकाने बंद न ठेवण्याबाबत तहसील येथे निवेदन

 जामखेड व्यापारी आसोसिएशनचे दुकाने बंद न ठेवण्याबाबत तहसील येथे निवेदन


नगरी दवंडी/प्रतिनिधी
जामखेड ः  जामखेड येथील शांतता कमिटीच्या बैठकीत नागपंचमी निमित्त गर्दी होऊन कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी प्रशासनास व शांतता कमिटीच्या वतीने शुक्रवार दि. 13 ऑगस्ट पुकारलेल्या जनता कर्फ्यूला जामखेड शहरातील व्यावसायिकांनी विरोध दर्शविला असून प्रशासनाने हा निर्णय रद्द करून व्यापार्‍यांना आपले व्यवसाय सुरू ठेवण्यास प्रतिबंध करू नये अशी विनंती विविध व्यापारी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत अधिकृत निवेदनही तहसीलदार कार्यालयकडे देण्यात आले आहे.
यावेळी दिलेल्या निवेदनावर माजी नगरसेवक आमित चिंतामणी, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, प्रदीप टापरे, आनंद गुगळे, कापड असोसिएशनचे अध्यक्ष संजय कटारिया, मोबाईल असोसिएशनचे सुनील जगताप , ऋतुराज फुटाणे, अभय कासवा, सागर आष्टेकर, शरद शिंगवी, अभय शिंगवी, मंगेश बेदमुथा, बाळासाहेब खैरे,अनुराग गुगळे, पंकज ढाळे, विजय कुलथे तुषार कुकरेजा, प्रशांत आरोरा, उमेश नगरे, राजु टेकाळे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment