नगर जिल्ह्याची ओळख शिवसेनेचा जिल्हा म्हणून व्हावी - संजय राऊत - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, July 31, 2021

नगर जिल्ह्याची ओळख शिवसेनेचा जिल्हा म्हणून व्हावी - संजय राऊत

 नगर जिल्ह्याची ओळख शिवसेनेचा जिल्हा म्हणून व्हावी - संजय राऊत

शनी शिंगणापूर देवस्थानच्या हॉस्पिटलच्या ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन..



नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर देवस्थानच्या हॉस्पिटलच्या ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन आज खा.संजय राऊत, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी खा. सदाशिव लोखंडे, विजय औटी, शिवसेना संपर्कप्रमुख भाऊ गोरेगावकर, महापौर रोहिणी शेंडगे व सर्व जिल्हा परीषद सदस्य, नगरसेवक, शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
याप्रसंगी संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी बोलताना ते म्हणाले की संपूर्ण गाव पातळीवर संपर्क अभियान सुरू आहे. त्याच्या समारोपाचा काळ जवळ आला आहे. जरी सरकार आमचं असलं तरी पक्षाचे संघटन अधिक मजबुतीने व्हावे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. नगर जिल्ह्यामध्ये शंकरराव गडाख आल्यापासून पक्ष वाढतो आहे. कार्यकर्त्यांना बळ मिळत आहे.या जिल्ह्याची ओळख शिवसेनेचा जिल्हा म्हणून व्हावी यासाठी सगळे प्रयत्न करत असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली.
पूरग्रस्त भागातील नागरिकांना मागील सरकारच्या काळात तात्काळ मदत केली होती. मात्र ठाकरे सरकार मदत जाहीर करत नाही अशा टीका करण्यात आल्या होत्या. यावर संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, विरोधी पक्षातील नेते मोकळे आहेत, मोकळा माणूस असतं डोक रिकामं असते असे आरोप करत असतात, त्यांनीसुद्धा सरकार चालवलं आहे. आमची आपेक्षा आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावं हेलिकॉप्टरने एक गिरकी मारावी आणि राज्याला हजार कोटी रुपयांची मदत द्यावी. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मदतीसंदर्भात निर्णय घेतले आहेत. सध्या पूरग्रस्तांच्या खात्यात 10 हजार रुपयांची मदत जमा करण्यात येत आहे. पंचनामे झाल्यावर अधिक मदत दिली जाईल.
राज्य सरकामध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे विरोधी पक्षनेत्यांनी म्हटलं आहे. यावर संजय राऊत म्हणालेकी, समन्वयाचा अभाव, हा समन्वय काय असतो. तीन पक्ष स्वतंत्रपणे काम करतायत ते करत राहतात. प्रत्येक पक्ष आपल्या पद्धतीने वाढत असतो. शरद पवार यांनी म्हटलं आहे सरकार एकत्र चालवण्याचे ठरवले आहे. पण पक्ष एकत्र चालवण्याचे ठरवले नाही. प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचे अधिकार आहेत. जेव्हा शिवसेना-भाजपची युती होती तेव्हा दोन्ही पक्ष शत-प्रतिशतचे नारे देतच होते यामध्ये काय चुकले? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.
महाविकास आघाडी सरकार अंतरवादामुळे पडणार असल्याचे वक्तव्य फडणवीस यांनी केलं आहे. मात्र हे सरकार उरलेला तीन वर्षाचा काळ अगदी व्यवस्थित पार पाडणार आहे. यामुळे उरलेल्या या तीन वर्षांच्या काळामध्ये कोणी पुन्हा येण्याची शक्यता नाही. भविष्यामध्ये सुद्धा आजचीच व्यवस्था कायम राहील याची खात्री असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment