दलित महासंघाचे तालुकाध्यक्ष रफिक शेख यांच्यावर हल्ला करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, July 17, 2021

दलित महासंघाचे तालुकाध्यक्ष रफिक शेख यांच्यावर हल्ला करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी

 दलित महासंघाचे तालुकाध्यक्ष रफिक शेख यांच्यावर हल्ला करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः नगर तालुक्यातील जेऊर बायजाबाई येथे दलित महासंघाचे नगर तालुका अध्यक्ष रफिक शेख यांच्यावर हल्ला करून जबर मारहाण करणार्‍या आरोपींना त्वरित अटक करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी दलित महासंघाच्यावतीने पोलीस अधीक्षक कार्यालय येथे निवेदन देण्यात आले.
यावेळी दलित महासंघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष काशिनाथ सुलाखे पाटील, जिल्हा अध्यक्ष संजय चांदणे, शहराध्यक्ष भिंगार सुरेंद्र घारू, शहराध्यक्ष विशाल भालेराव, दत्तात्रेय बडे, सौ.मंदाकिनी मेंगाळ, किशोर वाघमारे, बन्सीभाऊ वाघमारे, प्रदीप पवार आदी उपस्थित होते.
नगर तालुक्यातील जेऊर बायजाबाई येथे संतुकनाथ मठ आहे गेल्या अनेक वर्षापासून दलित महासंघाचे नगर तालुका अध्यक्ष रफिक शेख हे देखभाल करतात ते मुसलमान असून देखील हिंदू धर्माची सेवा करतात यांचा गावातील काही जातीयवादी आरोपींना राग होता म्हणून रफिक शेख यांना एकटे साधून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करून जबर जखमी करण्यात आले    तसेच शेख हे गावातील अनेक धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेत असल्याने जसे दिंडी, किर्तन, यात्रा आधी असे कामात शेख सहभाग घेतात याचा राग मनात धरुन आरोपी स्वप्निल भारत तवले, रविराज भिमराज तोडमल, सोमनाथ काशिनाथ तोडमल, वैभव तोडमल, मयूर बाळासाहेब तोडमल यांनी रफिक शेख यांच्यावर लाकडी दांडक्याने तसेच लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली व जीवे मारण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये ते जखमी झाले नंतर गावातील लोकांनी त्यांच्या उपचारासाठी अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले.   शेख हे फक्त मुसलमान असल्याने व त्यांचा गावातील धार्मिक कार्यात सहभाग असल्याने त्यांच्यावर हा प्राणघातक हल्ला झाला व तसेच त्यांना इथून पुढे गावातील कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतल्यास जिवंत सोडणार नाही असे धमकी त्यांना देण्यात आली आहे तरी वरील आरोपी यांना त्वरित अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी तसेच शेख यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे व त्यांच्यावर जाणीवपूर्वक खोटा गुन्हा दाखल केलेला मागे घेण्यात यावा अश्या मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षक कार्यालय येथे देण्यात आले अन्यथा दलित महासंघाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment