सभागृह नेते बारस्कर यांच्या आईची मुलाविषयी कृतार्थतेची भावना - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, July 3, 2021

सभागृह नेते बारस्कर यांच्या आईची मुलाविषयी कृतार्थतेची भावना

 सभागृह नेते बारस्कर यांच्या आईची मुलाविषयी कृतार्थतेची भावना


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः मनपा सभागृह नेते रविंद्र बारस्कर यांनी आईविषयी कृतज्ञता व्यक्त करताना आईला आग्रह करून महानगरपालिकेतील आपले कार्यालय दाखविले.आपला मुलगा महानगरपालिकेचा सभागृह नेता झाला हे कौतुक पहाण्याकरिता श्रीमती मंदाबाई बारस्कर या महानगरपालिकेत पोहोचल्या. सभागृह नेता या नात्याने महापालिकेत करत असलेल्या कामकाजाची आईला माहिती दिली. सभागृह नेत्याच्या म्हणजे स्वतःच्या खुर्चीवर मोठ्या कौतुकाने आईला बसवले. खुर्चीवर बसताना आईंचेही मन अभिमानाने भरून आले. आपल्या मुला-मुलींच्या कर्तृत्वाबद्दल  कोणी कौतुक केल्यास लहानाचे मोठे होईपर्यंत केलेल्या परिश्रमाचे चीज झाल्याचा त्यांना आनंद होतो.
यावेळी रविंद्र बारस्कर म्हणाले आई-वडिलांना भरभरून प्रेम देत त्यांचा आपलेपणाने सांभाळ केला की, परमेश्वर आपल्यास भरभरून आशीर्वाद देत आपली प्रगती घडवतो. आपले जीवन सत्कारणी लागल्याचे समाधान मिळते.वडिलांनीही नगरपालिका असताना नोकरी केलेली असल्यामुळे या संस्थेविषयी लहानपणापासून आदर व आपुलकी आहे. मी लहान असतानाच आईने माझ्या गळ्यात तुळशीची माळ घातली. ही माळ माझ्या जीवनात भगवंताचे अधिष्ठान ठेवणारी आणि मला व्यसनांपासून दूर ठेवणारी ठरली म्हणूनच मी कौटुंबिक, सामाजिक, व्यावसायिक आणि राजकिय जीवनात सतत यशस्वी होत आलो आहे, असे  रविंद्र बारस्कर यांनी नम्रपणे सांगत आपल्या यशाचे श्रेय आईस दिले. श्रीमती मंदाताई बारस्कर यांनी माझ्या मुला-मुलींविषयी मी खूप समाधानी आहे, असे सांगितले. मनपा सभागृह नेते रविंद्र बारस्कर यांनी आईचे महानगरपालिकेत स्वागत करून आईला स्वतःच्या खुर्चीवर बसवल्याचा विषय महानगरपालिकेत कौतुकाचा ठरला.

No comments:

Post a Comment