ऑनलाईन जिल्हास्तरीय स्पर्धेत भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचे घवघवीत यश - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, July 3, 2021

ऑनलाईन जिल्हास्तरीय स्पर्धेत भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचे घवघवीत यश

 ऑनलाईन जिल्हास्तरीय स्पर्धेत भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचे घवघवीत यश


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः लोकमत कॅम्पस क्लब आणि लोकमत बालविकास मंच यांच्या वतीने घेण्यात आलेल्या ऑनलाईन जिल्हास्तरीय स्पर्धेत गायन विभागात भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या म्युझिक अ‍ॅकेडमीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. जिल्हास्तरीय लहान गटात गौरव भुकन व मोठ्या गटात ज्ञानेश्वरी पांढरे यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तसेच मोठ्या गटात वरदा कुलकर्णी द्वितीय क्रमांक व भक्ती दिक्षित तृतीय क्रमांक मिळवून यशस्वी ठरले आहेत. शाळेचे मुख्याध्यापक उल्हास दुगड यांच्या हस्ते यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा मेडल व बक्षिस देवून सन्मान करण्यात आला. यावेळी  मार्गदर्शक संगीत शिक्षक परशुराम मुळे उपस्थित होते. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या कार्यवाह श्रीमती छाया फिरोदिया यांनी अभिनंदन केले आहे.
यावेळी मुख्याध्यापक उल्हास दुगड म्हणले, भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोस्ताहन देत ज्ञानदान करत आहे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थी शिक्षणा बरोबरच कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात कायम चमकत आहेत. शाळेतील शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन विद्यार्थांना मिळत आहे.

No comments:

Post a Comment