आसूड मोर्चात पोलिसांनी बळाचा दुरुपयोग केला पोलीस उपनिरीक्षक सोळंकेच्या निलंबनाची मागणी. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, July 7, 2021

आसूड मोर्चात पोलिसांनी बळाचा दुरुपयोग केला पोलीस उपनिरीक्षक सोळंकेच्या निलंबनाची मागणी.

 आसूड मोर्चात पोलिसांनी बळाचा दुरुपयोग केला पोलीस उपनिरीक्षक सोळंकेच्या निलंबनाची मागणी.

जिल्हा पोलिस अधीक्षकांना काँग्रेसचे निवेदन.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे प्रश्न घेऊन काँग्रेसने मनपा प्रशासनाच्या विरोधात आयोजित केलेल्या आसूड मोर्च्यात पोलीस उपनिरीक्षक सोळंके यांनी पोलीस बळाचा दुरुपयोग करून काँग्रेस कार्यकर्त्यांशी सराईत गुन्हेगाराप्रमाणे वर्तन करून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून बेकायदेशीर कृत्य केले असून सोळंके यांचे तात्काळ निलंबन करण्याची मागणी काँग्रेस कार्यकर्ते प्रवीण शरद गीते यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहराज्यमंत्री राजेश पाटील, विभागीय आयुक्त नाशिक यांना निवेदनाच्या प्रती पाठविण्यात आल्या आहेत.
श्री प्रवीण गीते यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, महापालिका हद्दीतील रस्त्यांची झालेली दुरावस्था व त्यावर पडलेल्या खड्ड्यांवर आधारित महानगरपालिकेच्या ठिकाणी काल आसूड मोर्चा आयोजित केला होता. मोर्चास तोफखाना पोलीस स्टेशनच्या कायदेशीर परवानगी बाबत पूर्तता केली होती. सदर महापालिकेमध्ये आज सामान्य महिला व पदाधिकारी महापालिकेत सनदशील व कायदेशीर मार्गाने नागरिक व पदाधिकारी सोशल डिस्टंसिंग चे पालन करून मास्कचा वापर करून उपस्थित होते. याच वेळी पोलीस उपनिरीक्षक श्री सोळंके उपस्थित होते. वरील आंदोलक सभ्य व शांतपणे आपले म्हणणे मांडत असताना सोळुंके यांनी महापालिकेच्या कार्यालयात जाण्यापासून महिला सामाजिक कार्यकर्त्या व पदाधिकारी यांना रोखले व अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून पदाधिकार्‍यांना कॉलरला पकडून आणले तसेच सामान्य तरुणांना मारहाण केली. अशा प्रकारे पदाचा व बळाचा दुरुपयोग केला पोलीस उपनिरीक्षक सोळुंके यांनी महिला व सामान्य कार्यकर्त्यांना सराईत गुन्हेगार समजून त्यांचा वर बळाचा दुरुपयोग केला तसेच महिला पदाधिकारी यांच्या वर सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. तसेच उपनिरीक्षक सोळंके हे महिला व पदाधिकारी यांना गुन्हा दाखल करण्याची धमकी देत होते. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये रेकॉर्ड झालेले आहे. सदर सीसीटीव्ही फुटेज प्रथमदर्शनी पुरावा आहे. श्री सोळंके यांचे बेकायदेशीर कृत्य हे स्पष्ट दिसत आहे. पोलीस अधीक्षक साहेब यांनी महापालिकेतील सीसीटीवी फुटेज ची माहिती घेऊन महिला व पदाधिकारी यांच्याशी केलेले गैरवर्तन पाहून उपनिरीक्षक सोळंके यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करावी असे निवेदनात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment