कृषि तंत्रज्ञान पार्कसाठी कृषि विद्यापीठास मिळणार भरीव निधी ः मुश्रीफ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, July 8, 2021

कृषि तंत्रज्ञान पार्कसाठी कृषि विद्यापीठास मिळणार भरीव निधी ः मुश्रीफ

 कृषि तंत्रज्ञान पार्कसाठी कृषि विद्यापीठास मिळणार भरीव निधी ः मुश्रीफ

कृषि विद्यापीठात वनमहोत्सव उत्साहात संपन्न


नगरी दवंडी/प्रतिनिधी
राहुरी ः महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कृषि शिक्षण, संशोधन व विस्तार या क्षेत्रामध्ये कार्य फार मोठे आहे. या विद्यापीठास कृषि तंत्रज्ञान पार्कसाठी भरीव निधी देण्यासाठी सर्व प्रयत्न करु असे प्रतिपादन ग्रामविकास व कामगार मंत्री आणि अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. हसन मुश्रीफ यांनी
महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या वनमहोत्सव सांगता समारंभात केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठात दि. 1 ते 7 जुलै, 2021 या कालावधीत वनमहोत्सव सप्ताह साजरा झाला. या पार्श्वभूमीवर आज अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ग्रामविकास मंत्री ना. श्री. हसन मुश्रीफ आणि आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री श्री. पोपटराव पवार यांच्या हस्ते वृक्षारोपन करुन वनमहोत्सव सप्ताहाचा सांगता समारंभ उत्साहात संपन्न झाला.
 पद्मश्री श्री. पोपटराव पवार यांनी बिगरगाभा पाणलोट क्षेत्र विकासासाठी विद्यापीठाच्या पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्पाला रु. 28 लाखाच्या निधीचे पत्र कुलगुरुंना सुपूर्त केले.
ते म्हणाले विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील दहा जिल्ह्यांमध्ये प्रत्येक जिल्ह्यात पाणलोट क्षेत्र विकासासाठी आदर्शगाव योजनेतून निधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करु असे आश्वासन दिले.
याप्रसंगी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले व विद्यापीठाच्या संशोधन, शिक्षण आणि विस्तारासंदर्भात माहिती दिली.
यावेळी अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलिस अधिक्षक श्री. मनोज पाटील, उपवनसंरक्षक श्रीमती सुवर्णा माने, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. दिपक पाटील, अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे, संशोधन तथा विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख, कुलसचिव डॉ. महानंद माने, नियंत्रक श्री. विजय कोते, विद्यापीठ अभियंता श्री. मिलिंद ढोके, पदव्युत्तर कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, निम्नस्तर कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे, हळगाव कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मिलिंद अहिरे यावेळी उपस्थित होते.
 याप्रसंगी अ पार्ट ब प्रक्षेत्र, पदव्युत्तर महाविद्यालयाच्या प्रांगणात, निवाराच्या प्रांगणात, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालय, राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प-वनशेती, आदर्श गाव योजनेतंर्गत पाणलोट क्षेत्र, मधवर्ती रोपवाटीका प्रक्षेत्र, कोरडवाहू फळे संशोधन प्रक्षेत्र, उद्यानविद्या विभाग, रोपवाटीका प्रक्षेत्र, वनशेती प्रकल्प-डिग्रज टेकडी, कमी क्षमता असणार्‍या पिकांवरील संशोधन प्रकल्प कार्यालयाचे उद्घाटन व वृक्षारोपनाचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी मध्यवर्ती परिसरातील सर्व विभाग प्रमुख, प्रकल्प प्रमुख यांनी आपल्या कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांचे मार्फत आपआपल्या विभागातील प्रक्षेत्रावर वृक्षारोपण केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या दहा जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील सर्व संशोधन केंद्रे, कृषि महाविद्यालयात या वनमहोत्सव सप्ताहा निमित्त 75 हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. कोव्हीड-19 च्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या निर्देशानुसार सोशल डिस्टसिंग, सॅनिटायझेशन व मास्कचा वापर करुन या सर्व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

No comments:

Post a Comment