महापौर रोहिणीताई शेंडगे यांचा मातंग समाजाच्या वतीने लहुजी वस्ताद साळवे यांचा अर्धाकृती पुतळा देऊन सत्कार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, July 16, 2021

महापौर रोहिणीताई शेंडगे यांचा मातंग समाजाच्या वतीने लहुजी वस्ताद साळवे यांचा अर्धाकृती पुतळा देऊन सत्कार

 महापौर रोहिणीताई शेंडगे यांचा मातंग समाजाच्या वतीने लहुजी वस्ताद साळवे यांचा अर्धाकृती पुतळा देऊन सत्कार


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौरपदी रोहिणीताई शेंडगे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल मातंग समाजाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचा अर्धाकृती पुतळा देऊन महापौर शेंडगे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उमाताई शेकटकर, वर्षाताई वाघमारे, सुनिता बुलाखे, सिंधुताई खुडे, कुसुम जगधने, बेबीताई उमाप, लताताई नन्नवरे, मालनबाई गांगुर्डे यांनी महापौरांना मानाची साडीचोळी भेट दिली.
प्रास्ताविकात भगवान जगताप यांनी आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या जीवनकार्यास उजाळा देताना क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले यांना महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ उभारताना लहुजी वस्तादांचा सामाजिक संघर्ष, त्याचबरोबर दीनदुबळ्यांच्या हक्कासाठी लढत, सावकारी पाशातून जनसमूहाला मुक्तीसाठी सावकारी दप्तर होळीेचा लढा, स्वातंत्र्यचळवळीत मोलाचे योगदान करणारे क्रांतिवीर व संपूर्ण देशाला न्याय हक्काच्या व शिक्षणाच्या उपक्रमातून मानव म्हणून जीवन साकारण्याच्या चळवळीचे योगदान, आणि लहुजींचा वारसा सांगीतला.
माजी नगरसेवक अनिल शेकटकर म्हणाले की, ऐतिहासिक अहमदनगर शहराच्या महापालिकेत मातंग समाजातील महिला प्रतिनिधित्व करते हे समाजाच्या दृष्टीने भुषणावह आहे. त्या शहराला व सर्व महिलांना न्याय व हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतील अशी अपेक्षा व्यक्त केली. साहेबराव काते यांनी मातंग समाजासह आर्थिक दुर्बल घटक असलेल्या समाजाला प्रवाहात आनण्यासाठी भरीव कार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी माजी नगरसेवक अनिल शेकटकर, भगवान जगताप, विजय पाचारणे, बाळासाहेब जगधने, सुनील भोसले, विजय वडागळे, सुनील सकट, अशोकराव शिंदे, बाबाजी खुडे, गणेश शेकटकर, विश्वेंद्र पवार, मोहन बुलाखे, बाळासाहेब उमाप, संदिप पठारे, अभय शेकटकर, अजय पठारे, संदेश शेकटकर, सत्यम शिरसाठ, सोनू मोहिते, सागर कुटी, जालिंदर शेलार, भगवान मिसाळ, प्रदिप ससाणे आदींसह समाजबांधव सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment