हॉटेलमध्ये कुंटनखाना. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, July 14, 2021

हॉटेलमध्ये कुंटनखाना.

 हॉटेलमध्ये कुंटनखाना.

तीन परप्रांतीय मुलींची सुटका; 2 जणांना अटक.


गरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर तालुक्यातील खंडाळा शिवारातील नगर-दौंड रस्त्याच्या बाजूला असणार्‍या हॉटेल राजयोग मध्ये चालू असणार्‍या वैश्या व्यवसायावर नगर तालुका पोलिसांनी छापा मारून तीन परप्रांतीय मुलींची सुटका करून हॉटेल मालकावर स्त्रिया, मुली अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून दोन जणांना अटक केली आहे.
याबाबत समजलेले माहिती अशी की, नगर ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांना नगर तालुक्यातील खंडाळ गावाच्या शिवारात नगर ते दौड जाणारे रोडच्या बाजूला असणारे हॉटेल राजयोगमध्ये मालक अनिल माणीकराव कर्डीले (वय 52) व अक्षय अनिल कर्डीले (वय 25. दोघे रा - खंडाळा ता.जि.अ.नगर)हे दोघे संगनमताने आपले स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी हॉटेलमध्ये परप्रांतीय मुलीना देहविक्री करण्यासाठी बोलावून घेऊन त्यांचे मार्फत गैरमार्गाने देहविक्री करुन कुंठणखाना चालवीत आहे, अशी माहिती मिळाली होती.
या माहितीनुसार श्री पाटील यांच्यासह नगर तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि राजेंद्र सानप यांच्या पोलीस पथकाने छापा टाकला.या छाप्यामध्ये तीन परप्रांतीय मुली मिळवून आल्या. त्याना स्नेहालय येथे पाठवले आहे. दरम्यान, हॉटेल मालक व मुलगा याना पिटा कायद्यान्वये अटक करण्यात आली आहे. 500 रु.दराच्या 14 नोटा व 100 रु.दराच्या 15 नोटा असे एकुण 8 हजार 500 रुपयांचे जप्त करण्यात आले आहे.हॉटेल मालक व मुलगा यांना अटक करून नगर तालुका पोलिस ठाण्याचे पोउपनि दिलीप बोडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गु.रजि.नं. 385/2021 स्त्रीया व मुलींचा अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायदा सन 1956 चे कलम 3,4,5 प्रमाणे नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment