श्री गुरुदत्त मल्टीस्टेटने नवीन व्यवसायवृद्धीसाठी कार्य करावे ः आ. जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, July 19, 2021

श्री गुरुदत्त मल्टीस्टेटने नवीन व्यवसायवृद्धीसाठी कार्य करावे ः आ. जगताप

 श्री गुरुदत्त मल्टीस्टेटने नवीन व्यवसायवृद्धीसाठी कार्य करावे ः आ. जगताप

अहमदनगर शहरात श्री गुरुदत्त मल्टीस्टेटच्या  नवीन शाखेचा शुभारंभ


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः पारनेर तालुक्याची अर्थवाहिनी म्हणून समोर येत असलेल्या श्री गुरुदत्त मल्टीस्टेट पतसंस्थेच्या अहमदनगर येथील नवीन शाखेचा शुभारंभ दि. 14 जुलै 2021 रोजी अहमदनगर शहराचे आमदार मा. संग्राम जगताप व महापौर रोहिणीताई शेंडगे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर जिल्हा प्रेस क्लबचे अध्यक्ष मा. शिवाजी शिर्के होते.
संस्थापक चेअरमन बा. ठ. झावरे पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये संस्थेच्या प्रगतीचा  आलेख  विशद करताना  मुख्य कार्यालयासह 7 शाखांच्या माध्यमातून अवघ्या 9 वर्षाच्या कालावधीमध्ये 65 कोटी 63 लाख  ठेवींचा  टप्पा पार केला असून कर्ज वाटप 52 कोटी 56 लाख रुपये आहे. संस्थेची  विविध बँकामध्ये 16 कोटी 72 लाख इतकी सुरक्षित गुंतवणुक असून थकबाकीचे प्रमाण अत्यल्प ठेवण्यात संस्थेला यश आले असल्याचे त्यांनी  सांगितले.
संस्थेच्या प्रगतीचा वाढता आलेख  सहकार क्षेत्राला व पतसंस्था चळवळीला नक्कीच बळकटी देणारा आहे. पारनेर तालुक्याची अर्थवाहिनी म्हणून ही संस्था नावारूपाला आलेली आहे. ग्रामीण भागातील शेतकरी व व्यवसायिक यांना अर्थसहाय्य करण्याचे काम  संस्थेने केलेले आहे. ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातील सभासदांच्या सोईसाठी नविन शाखा सुरु करण्याचा संचालक मंडळाने निर्णय घेतला.  
नगर वासियांच्या सेवेसाठी चितळे रोड येथे शाखा सुरु केल्याने सभासदांनी समाधान व्यक्त केले. लवकरच  सुपा व आळेफाटा येथे शाखा सुरु करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
शुभारंभप्रसंगी आमदार. संग्राम जगताप व महापौर रोहिणीताई शेंडगे यांनी संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना आमदार मा.संग्रामभैय्या जगताप म्हणाले की पतसंस्था चळवळीमुळे आज सहकार क्षेत्र  टिकून आहे. पतसंस्थेच्या माध्यमातून समाजात आज  अनेक छोटे-मोठे व्यवसाय हे उभे राहत आहेत.
त्यामुळे ही पतसंस्था चळवळ आता टिकून राहिली पाहिजे असे मत व्यक्त केले. शहरातील नवीन व्यवसायिकांना व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य करावे अशी मनोकामना त्यांनी वक्त केली. सदर प्रसंगी अध्यक्षीय भाषणात बोलताना शिवाजीराव शिर्के यांनी ठेवीदार, कर्जदार व सभासद यांचा उत्कृष्ठ मेळ बसल्यानंतर सहकार चळवळीची प्रगती निश्चित होते,असे मत त्यांनी व्यक्त केले. सदर प्रसंगी सुरेश वाबळे, डॉ. संजय कळमकर, रा. या. औटी, शिवाजीराव कपाळे आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील, जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. मीराताई शेटे, राजेश भंडारी, कडूभाऊ काळे, राजेंद्र नलगे, बाजीराव पानमंद, नगरसेवक सचिन शिंदे, संतोष येनाप्पा, श्यामआप्पा नळकांडे, आरीफभाई शेख, सुरज बनसोडे, डॉ. अक्षयदिप झावरे पाटील, पत्रकार संजय वाघमारे, शरद झावरे, मार्तंड बुचुडे, नंदकुमार सातपुते, संजय धामणे, बापुसाहेब तांबे, सुदर्शन शिंदे, पारुनाथ ढोकळे, नितीन काकडे, सुनिल बनोटे, राहुल भागवत, विलास साठे, एकनाथ व्यवहारे, पोपट नांगरे, एल. पी. नरसाळे, संभाजी औटी, भागुजी झावरे, भाऊ सैद, रामचंद्र जाधव, बापुसाहेब गायखे आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिताराम जगदाळे यांनी केले तर आभार पी. डी. बर्वे यांनी मानले.

पारनेरसारख्या ग्रामीण भागामध्ये स्थापन झालेल्या श्री गुरुदत्त मल्टीस्टेटचा आलेख वाढत असून नगर शहरातील शाखेच्या माध्यमातून संस्था समाजात नवीन व्यवसाय निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात यापुढील काळात अर्थसहाय्य करेल. त्या माध्यमातून अनेक व्यवसाय समाजामध्ये उभे राहतील व त्याचा युवकांना रोजगार निर्मितीसाठी निश्चित फायदा झाल्याशिवाय राहणार नाही.
     - आ. संग्राम जगताप (अहमदनगर शहर)

No comments:

Post a Comment