सात-बारा दुरुस्तीसाठी गुंडेगाव येथे चावडी वाचन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, July 12, 2021

सात-बारा दुरुस्तीसाठी गुंडेगाव येथे चावडी वाचन

 सात-बारा दुरुस्तीसाठी गुंडेगाव येथे चावडी वाचन


नगरी दवंडी/प्रतिनिधी
गुंडेगाव ः संगणक प्रणालीचा अवलंब करून महसुली विभागाच्या नोंदी एका क्लिकवर आणण्यासाठी गाव  पातळीवर चावडी वाचनास सुरुवात केली आहे. तहसीलदारांच्या माध्यमातून तालुक्यांमध्ये चावडी वाचनाची मोहीम सुरू करण्यात आली असून या मोहिमेमुळे संगणकीकृत सात-बारा दुरुस्तीच्या कामाला गती मिळणार आहे. या मोहिमेसाठी गुंडेगाव येथे चावडी वाचन करण्यात आले  .
सात-बारा उतारा संगणकीकरण करताना अचूकता यावी यासाठी ई-फेरफार प्रणालीद्वारे  गावात चावडी वाचनाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. प्रांताधिकारी आणि तहसीलदारांच्या माध्यमातून तालुकास्तरावर मोहीम राबविली जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पाचपेक्षा अधिक तालुक्यांमध्ये सात-बारा दुरुस्तीची कामे झाली असून उर्वरित तालुक्यांतील कामे देखील तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
ई-फेरफार प्रणालीमध्ये अधिकार अभिलेखाचे कामकाज शंभर टक्के संगणकीकृत झाले आहे. महसूल विभागाच्या नोंदी अद्ययावत व अचूक करण्यासाठी ई-चावडी प्रणालीचा अवलंब करून या प्रणालीमध्ये प्रत्येक गावातील महसुली नोंदीची माहिती संगणकीकृत करण्यात येत आहे. त्यामध्ये सात-बारा उतार्‍याच्या आधारे नोंदणी करण्याला प्राधान्य देण्यात आलेले आहे. हस्तलिखित सात-बारा उतार्‍याच्या नोंदीची पडताळणी व दुरुस्ती करून संगणकीकरण करण्यासाठी तालुक्यांमध्ये विशेष मोहीम राबविली जात आहे.
सात-बारा उतार्‍यातील नोंदीबाबतचे अनेक आक्षेप असतात. या नोंदणीमध्ये असलेल्या त्रुटींबाबतच्या देखील तक्रारी महसूल विभागाकडे केल्या जातात. अशा तक्रारींचे गुंडेगाव येथील  10 ते 22 शेतकर्याचे निरासन करण्यात आले चावडी वाचनावेळी  तलाठी  गौडा भाऊसाहेब, जेष्ठ समाजसेवक भापकर गुरूजी, पत्रकार संजय भापकर, सखाराम हराळ, कचरू धावडे, कोतवाल रामदास अदि शेतकरी उपस्थितीत होते. 

No comments:

Post a Comment