गुंडेगाव येथे मोठ्या प्रमाणात लसीकरण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, July 12, 2021

गुंडेगाव येथे मोठ्या प्रमाणात लसीकरण

 गुंडेगाव येथे मोठ्या प्रमाणात लसीकरण


नगरी दवंडी/प्रतिनिधी
गुंडेगाव ः गुंडेगाव ( ता.नगर) हे गाव कोरोना मुक्तीकडे वाटचाल करत आहे. काल दिनांक (  10 जुलै ) रोजी कोव्हिड लसीचे मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध करून यांचे  आयोजन वाळकी प्रा.आरोग्य केंद्राचे  वैद्यकीय अधिकारी डॉ अनिल ससाणे याच्या मार्गदर्शनाखाली गुंडेगाव  परिसरातील 45 वर्षे पुढील 70 लोकांना कोव्हिड लसीचे डोस देण्यात आले व दुसर्या डोस साठी 92 वर्षीय जेष्ठ समाजसेवक राजाराम भापकर गुरूजी सह 130 लोकांचे लसीकरण करण्यात आले.  यावेळी प्रत्येकांची आरटीपीसार  टेस्ट तपासणी करण्यात आली. यावेळी  गुंडेगाव येथील प्रत्येक  व्यक्तीना लवकरात लवकर डोस उपलब्ध होणारआहे आसे मत मा. जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ  यांनी व्यक्त केले आहे.
वेळोवेळी  कॉन्टॅक्ट ट्रेसींग आणि ग्राम दक्षता समितीने संशयीत तपासणीमध्ये सातत्य ठेवल्याने जुन अखेर गावातील केवळ नगण्य  रुग्णांवर उपचार सुरू असून, नव्याने एकही रुग्ण गावात आढळून आलेला नाही ग्राम समितीच्या अध्यक्षा  संरपच सौ मंगलताई संकट यांनी सांगितले.
मागिल काळात गावातील 60 वर्षे पुढील  व्यक्तींना कोव्हिड 19 चा डोस यशस्वीपणे  राबवला आहे आसे मत उपसंरपच संतोष भापकर यांनी व्यक्त केले आहे.  यावेळी मा. संरपच मंगलताई सकट ,मा.चेअरमन  बबनराव हराळ , माजी संरपच संजय कोतकर,  हराळ, सामाजिक कार्यकर्ते संतोष सकट,   ग्रामपंचायत सदस्य- सुनील भापकर ,भाऊसाहेब   हराळ,राहूल चौधरी,  संभाजी जाधव, धनंजय हराळ,  पत्रकार संजय भापकर, माऊली कुताळ , यश चौधरी ,गुंडेगाव उपकेंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ.सोनाली चव्हाण,  आरोग्य सेवक डॉ विलास दाताळ,डॉ.घायमुक्ते, जगताप,  चोरडिया सिस्टर, कोतकर सिस्टर, आशा सेविका कविता कुताळ, प्रिती भापकर, मनिषा कुताळ आदींनी परीश्रम घेतले...

No comments:

Post a Comment