जनतेच्या प्रश्नांना उत्तर द्यायला हे सरकार घाबरतय- मुंढे. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, July 5, 2021

जनतेच्या प्रश्नांना उत्तर द्यायला हे सरकार घाबरतय- मुंढे.

 जनतेच्या प्रश्नांना उत्तर द्यायला हे सरकार घाबरतय- मुंढे.

भाजपाची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः महाराष्ट्र विधी मंडळाचे दोन दिवसाचे अधिवेशन सुरु झाले आहे, परंतु अधिवेशन म्हणजे लोकशाहीची क्रुर थट्टा ठरणार आहे. कारण राज्या समोरील कोणत्याही महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा या अधिवेशनात होणार नाही. विधिमंडळ सदस्यांचे घटनेने दिलेले अधिकार, प्रश्न विचारणे, स्थगन प्रस्ताव, लक्षवेधी आदी व्यापगत केले आहेत. राज्यामध्ये आघाडी सरकारचे एक-एक मंत्री भ्रष्टाचारामध्ये अडकत चालले असून, सरकार चालविण्यास हे आघाडी सरकार अपयशी ठरल्याने  त्यांनी आता पायउतार व्हावे व राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी करत आहोत. जनतेच्या प्रश्नांना उत्तर द्यायला हे सरकार घाबरत असल्याचा आरोप करत नगर जिल्हा भाजपाच्यावतीने जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे निदर्शने करुन निवेदन देऊन राज्य सरकारचा निषेध केला.
श्री.मुंढे पुढे म्हणाले की, सत्तेतील महाआघाडी सरकार जनतेच्या प्रश्नांना उत्तर द्यायला घाबरत आहे. मधल्या काळात भ्रष्ट्रचार व महिलांवरील अत्याचारामुळे दोन मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले आहेत. आणखी काही मंत्र्यांवर भ्रष्टाचारांचे आरोप आहेत. त्याचप्रमाणे कोरोनाशी मुकाबला करण्यात हे सरकार सपशेल अपयशी ठरले असून, कोणत्याही स्वरुपाची कोरोना रुग्णांना मदत केलेली नाही. त्याचप्रमाणे लॉकडाऊनमुळे अडचणीत असणार्या जनतेला आर्थिक पॅकेज दिलेले नाही. शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे देशात राज्यात सगळ्यात जास्त कोरोना रुग्ण आहेत व मृत्यूही जास्तच झाले आहेत. यासर्व विषयावर विरोधी पक्ष प्रश्नांचा भडीमार करील व सरकारचा नाकर्तेपणा जनतेसमोर उघडा पडेल अशा भितीपोटी अधिवेशन फक्त दोन दिवसांचे ठेवण्यात
आले आहे. त्यामुळे हा कालावधी वाढविण्यात येऊन जनतेचे प्रश्न सोडवावे अशी मागणी आम्ही करात आहोत.
यावेळी प्रा.भानुदास बेरड म्हणाले, या सरकारने वाझे सारखे अनेक वाझे प्रत्येक जिल्ह्यात निर्माण केले आहे. तसेच आषाढी वारी संदर्भात वारकर्यांच्या भावनांशी खेळत आहे. कोरोनावर नियंत्रण नाही, लॉकडाऊनमुळे रोजगार गेले आहेत, आर्थिक मदत जनतेला मिळत नाही, त्यामुळे सरकार बरखास्तीशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. निवेदनाच्या प्रती मा.राष्ट्रपती व राज्यपालांना पाठविण्यात आल्या आहेत. यावेळी गणेश कर्हाड, मनोज कोकाटे, साहेबराव तोडमल, संदिप जाधव, गणेश जायभाय, प्रशांत गहिले, बप्पासाहेब भालसिंग, गणेश भालसिंग, महेश लांडगे, दत्ता नलवडे, सुनिल थोरात, सागर भोपे, रामदास बनकर, नंदा चाबुकस्वार, मंजुश्री जोकारे आदि उपस्थित होते. याप्रसंगी  माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, दिलीप भालसिंग, शामराव पिंपळे, अ‍ॅड.विवेक नाईक, अशोक खेडकर, नरेश शेळके, दादा बोठे, महेश तवले, संतोष रायकर, अर्चना चौधरी, अनिल लांडगे, धनंजय बडे आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment