संघटीत गुन्हेगारी टोळीला ‘मौक्का’चा धक्का! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, July 5, 2021

संघटीत गुन्हेगारी टोळीला ‘मौक्का’चा धक्का!

 संघटीत गुन्हेगारी टोळीला ‘मौक्का’चा धक्का!

जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या रडारवर कुख्यात गुन्हेगारांच्या टोळ्या...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर जिल्हयातील नगर तालुका, कोपरगाव तालुका व संगमनेर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत दरोडा टाकणे, फसवणूक करुन दरोडा टाकणे, दरोडयाची तयारी करणे, घातक शस्त्रासह दरोडा टाकणे, जबरी चोरी करणे, कट करुन दरोडा टाकणे, जबरी चोरी करतांना खुन करणे, अशा दखलपात्र स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल असणारे संघटीत गुन्हे करणारे कुख्यात गुन्हेगार राहुल निवाश्या भोसले वय, 22 रा. जुना सारोळा कासार, ता. जि. नगर व त्याचे टोळीतील इतर 4 सदस्यांविरुध्द मोक्का कायदयान्वये कारवाई करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे.
पोलीस अधीक्षक  मनोज पाटील यांनी नगर जिल्हयातील गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी विविध गुन्हेगारांची माहिती संकलीत करून ज्या संघटीत गुन्हेगारी टोळया आहेत त्यांचे विरुध्द मोक्का कायदयान्वये कारवाई करण्याचे संकेत दिले होते. त्या अनुशंगाने नगर तालुका पोलीस स्टेशन मधील15/04/2021 रोजी घडलेला गुन्हा राहुल निवाश्या भोसले वय, 22 रा. जुना सारोळा कासार, ता. जि. अहमदनगर (टोळीप्रमुख) व त्यांचे टोळीने संघटीतपणे केल्याचे तपासात निष्पन्न झाले. या टोळीविरुध्द मोक्का कायद्याअन्वये कारवाई करणे करीता नगर तालुका पोलीस स्टेशन मधून 28 जून 2021 रोजी (मोक्का) प्रस्ताव  विशेष पोलीस महानिरीक्षक  नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांचेकडे पाठविण्यात आला होता.या प्रस्तावास दिनांक 02 जुलै2021 रोजी  विशेष पोलीस महानिरीक्षक  नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांची मंजुरी मिळाली होती. ही मुजुरी मिळाल्यानंतर राहूल निर्वाश्या भोसले, वय 22 वर्षे, रा. जुना सारोळा कासार, ता. जि. नगर (अटक)  उरुस ज्ञानदेव चव्हाण, वय 33 वर्षे, रा. बुरुडगाव, ता. जि. नगर (अटक), दगू बडूद भोसले, वय 27 वर्षे, रा. पडेगाव, ता. कोपरगाव, जि. नगर (अटक), निवाश्या चंदर ऊर्फ सिताराम भोसले, रा. सारोळा कासार, ता. जि. नगर (फरार, पप्या मोतीलाल काळे, रा. पैठण, ता. पैठण, जि. (फरार) यांच्याविरुद्ध मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे.
या टोळीविरुध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 चे कलम 3 (1) (11), 3(2) व 3(4) (मोक्का) अन्वये कारवाई मा. विशेष पोलीस महानिरीक्षक सो नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांची मंजुरी मिळाल्याने सदर गुन्हयाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामिण विभाग जि. नगर हे करीत आहेत.वरील प्रमाणे गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणारी टोळीविरुध्द वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. अशा प्रकारे नगर जिल्हातील गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणारे टोळीविरुध्द देखील आगामी काळात मोक्का कायदया अन्वये कारवाई करणार असल्याचे संकेत . पोलीस अधीक्षक. मनोज पाटील , यांनी दिलेले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here