धोत्रे बुः गावात कोरोना साखळी तोडण्यासाठी लोकांची शंभर टक्के टेस्ट करण्याचे आदेश - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, July 16, 2021

धोत्रे बुः गावात कोरोना साखळी तोडण्यासाठी लोकांची शंभर टक्के टेस्ट करण्याचे आदेश

 धोत्रे बुः गावात कोरोना साखळी तोडण्यासाठी लोकांची शंभर टक्के टेस्ट करण्याचे आदेश


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
पारनेर ः धोत्रे बुः गावात कोरोना पेशंट ची संख्या जास्त प्रमाणात वाढल्याने.. पारनेर तहसीलदार देवरे मॅडम यांनी कोरोना साखळी तोडण्यासाठी लोकांची शंभर टक्के टेस्ट करण्याचे आदेश दिले.. गावातील बहुतांश लोक हे मेंढपाळ आहेत.. ते टेस्ट करायला घाबरतात...अशा लोकांचे प्रबोधन करून.. समजावून सांगत... त्यांच्या अडचणी समजावून घेत त्यांना टेस्ट करायला लावली जाते... या कामी ग्रामपंचायत कोरोना समितीच्या सर्व लोकांना जि.प.शाळा धोत्रे बुः चे मुख्याध्यापक मच्छिंद्र साळवे सर हे जीवावर ऊदार होऊन सहकार्य करीत आहेत. वेळप्रसंगी मेंढपाळ लोकांचे मेंढरे.. कोरोना टेस्ट होईपर्यंत लोकांची अडचण लक्षात घेऊन मेढपाळांची मेंढरे सांभाळतात पण कोरोना साखळी  तोडण्यासाठी टेस्ट करायलाच लावतात. गाव कोरोना मुक्त करण्यासाठी प्रयत्न करतात.. या गावात गेल्या आठ दिवसापासून दररोज घरोघरी जाऊन टेस्ट कैंप राबविण्यात येत आहे.. या कामी धोत्रे बुः गावातील जि.प. शाळेतील सर्व शिक्षक... धोत्रे खुर्द.. तुफान वस्ती.. मंचरेदरा.. धोत्रे हायस्कूल या सर्व शाळेतील शिक्षक.. मुख्याध्यापक.. यांचे सहकार्य मिळत आहे... हे सर्व शिक्षक आरोग्य पथकाबरोबर जिवावर उदार होऊन धोत्रे गाव कोरोना मुक्ती साठी आठ दिवसापासून प्रयत्न करीत आहेत.. याकामी गावचे सरपंच वनिता चंद्रकांत कसबे व उपसरपंच राजू रोडे व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी मुख्याध्यापक मच्छिंद्र साळवे व सर्व शिक्षक यांचे कौतुक केले आहे.

No comments:

Post a Comment