“टम्या”चा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, July 2, 2021

“टम्या”चा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला.

 “टम्या”चा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला.

रेखा जरे हत्या आरोपी म्हणाला तो मी नव्हेच.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः रेखा जरे हत्या प्रकरणातील आरोपी ऋषिकेश उर्फ टम्या वसंत पवार याने या प्रकरणात तो मी नव्हेच माझा या हत्या प्रकरणात सहभाग नसून मला जामीन द्या. असा अर्ज न्यायालयात दाखल केला पण न्यायालयाने परिस्थिती जन्य पुरावे पाहून जामीन फेटाळला.
जरे यांच्या हत्याकांडानंतर पोलिसांनी इतर आरोपींसह पवार यालाही अटक केली होती. न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर पवार याच्या वतीने जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. जिल्हा न्यायाधीश बी एम पाटील यांच्यासमोर या अर्जाची सुनावणी झाली यावेळी सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील उमेश चन्द्र यादव पाटील तसेच फिर्यादीचे वकील सचिन पटेकर यांनी न्यायालयात बाजू मांडली. रेखा जरे यांना पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटामध्ये मारण्याचा कट रचला होता, तेव्हा पवार याचे व इतर आरोपींचे फोन झाले असल्याचे तपासात आढळून आले होते. पवार याचे इतर आरोपींसोबत संबंध होते त्यांनी वेळोवेळी फोन करून गटातील इतर आरोपींना अपडेट दिले होते.वरील सर्व घटनाक्रम पाहता पवार यांची इतर आरोपींसोबत मिलीभगत असल्याचे दिसून येते, असा युक्तिवाद सरकारी पक्षाकडून करण्यात आला होता सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी पवार याचा जामीन अर्ज नामंजूर केला आहे.

No comments:

Post a Comment