कष्टकर्‍यांचा नेता माजी आमदार गणपतराव देशमुख काळाच्या पडद्याआड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, July 31, 2021

कष्टकर्‍यांचा नेता माजी आमदार गणपतराव देशमुख काळाच्या पडद्याआड

 कष्टकर्‍यांचा नेता माजी आमदार गणपतराव देशमुख काळाच्या पडद्याआड


सोलापूर-
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते व सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे काल रात्री 9 वाजता सोलापुरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. दोन दिवसांपूर्वी त्यांच्यावर पित्ताशयाची शस्त्रक्रिया झाली होती मृत्यु समयी ते 94 वर्षाचे होते. आबांनी सोलापूर तालुक्यातील सांगोला मतदारसंघाचे विधानसभेत 50 वर्षे प्रतिनिधित्व केले.

गणपतराव देशमुख तथा आबा यांचे पार्थिव सांगोल्यातदाखल झाले असून अंत्यदर्शनाची कार्यकर्त्यांची तुफान गर्दी सांगोल्यात झाली आहे. लोकनेते म्हणून ओळखले जात असलेल्या आबांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन मिळावे यासाठी सोलापूर जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातून कार्यकर्ते सकाळीच सांगोल्यात दाखल झाले आहेत. गणपतराव देशमुख यांनी विधानसभेमध्ये तब्बल 50 वर्षे सांगोला मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले होते.सांगोला तालुक्यातील त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा त्यांच्या मागे परिवार आहे.

गिनिज बुकात नोंद असलेला विश्वविक्रमी आमदार
  एकाच पक्षातून तब्बल 11 वेळा लढवली निवडणूक राजकारणातील भिष्माचार्य, आबा, विधानसभेचे विद्यापीठ म्हणून ओळख. वकिलीच्या माध्यमातून शेतकर्‍यांशी संपर्क. 1962 साली सांगोल्यातून पहिला विजय व कारकिर्द बहरली. 1977 साली विरोधी पक्षनेतेपद सांभाळले. 1978 साली पुलोद सरकारमध्ये पहिल्यांदा मंत्री. 1999 साली पुन्हा मंत्रीपद. त्यांच्या प्रयत्नानेच दुष्काळी सांगोल्यात टेंभूचे पाणी आले.


No comments:

Post a Comment