मायलेकींचा विहिरीत बुडून मृत्यू - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, July 19, 2021

मायलेकींचा विहिरीत बुडून मृत्यू

 मायलेकींचा विहिरीत बुडून मृत्यू


राशीन :
घरातील स्वयंपाकासाठी शेतात जळाऊ लाकड आणण्यासाठी गेलेल्या मायलेकींचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना राशीन (ता. कर्जत) नजीक कानुगडेवाडी शिवारात शनिवारी (दि.17) सकाळी घडली. या घटनेमध्ये आशा राजू उकिरडे (वय 42), उमा राजू उकिरडे (वय 16) या मायलेकींचा मृत्यू झाला.
घरातील स्वयंपाकासाठी सकाळी साडेअकराच्या सुमारास शेतात जळाऊ लाकूड आणण्यासाठी गेलेल्या मायलेकी सायंकाळ झाली तरी घरी आल्या नाहीत. त्यामुळे पती राजू उकिरडे आणि शेजारी यांनी परिसरात शोध घेतल्यानंतर कानुगडेवाडी शिवारातील संदीप कानुगडे यांच्या शेतातील विहिरीजवळ स्कार्प व पांढर्‍या रंगाचे दावे दिसून आले. त्यामुळे विहिरीत पाहिले असता आशा उकिरडे यांचा मृतदेह विहिरीत तरंगताना दिसून आला. मात्र, मुलीचा शोध लागत नव्हता. विहिरीतील पाण्यावर दोघींच्या पायातील चपला तरंगताना दिसत होत्या. शनिवारी मध्यरात्री आशा यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढल्यानंतर त्यांची मुलगी उमाचा पोलीस आणि ग्रामस्थांनी शोध घेतला. मात्र, मृतदेह सापडत नव्हता. मृतदेह रविवारी (दि.18) सकाळी शोधल्यानंतर त्याच विहिरीत सापडला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी घटनास्थळी येऊन विहिरीत उतरून आशा यांचा मृतदेह बाहेर काढला व पंचनामा केला. विहिरीजवळील लिंबाच्या झाडाच्या वाळलेल्या फांद्या काढत असताना पाय घसरून मुलगी विहिरीत पडली असावी. मुलीस वाचविण्यासाठी गेलेली आईही विहिरीत बुडाली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. राजू पांडुरंग उकिरडे यांच्या खबरीवरून राशीन पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here