साखरपुडा, विवाह .समारंभातच कोरोना चाचणी. पारनेर तहसीलदारांचा नवा फॉर्म्युला.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, July 19, 2021

साखरपुडा, विवाह .समारंभातच कोरोना चाचणी. पारनेर तहसीलदारांचा नवा फॉर्म्युला..

 साखरपुडा, विवाह .समारंभातच कोरोना चाचणी. पारनेर तहसीलदारांचा नवा फॉर्म्युला..

3 हजार 600 जणांच्या तपासणीत 43 कोरोना पॉझिटिव्ह.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
पारनेर ः विवाह समारंभ, साखरपुडा म्हटलं की गर्दी होणारच. या गर्दीत सोशल डिस्टंसिंगचं पालन करणं, मास्क वापरणे याकडे दुर्लक्ष केलं जातं. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय हे ओळखून पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी या समारंभात उपस्थित असणार्‍या नागरिकांची कोरोना चाचणी करण्याचा नवा फॉर्म्युला अमलात आणला. काल तालुक्यातील 13 ठिकाणी संपन्न होत असलेल्या साखरपुडा, विवाह समारंभातील 3 हजार 600 नागरिकांची कोरोना चाचणी केल्यानंतर 43 नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
पारनेर तालुक्यातील करोना संसर्गाला आळा बसण्यासाठी प्रशासनाने लग्न समारंभ आणि त्या ठिकाणी होणार्‍या गर्दीवर लक्ष केंद्रीत केले. रविवारी तालुक्यात 13 ठिकाणी लग्न समारंभ, साखरपुडा या ठिकाणी जमलेल्या 3 हजार 600 लोकांची करोना चाचणी  केल्यानंतर त्यात 43 करोना बाधित आढळले आहे. अशा प्रकारे सामुहिकपणे लग्न सोहळ्यात वर्‍हाडी मंडळींची करोना चाचणीचा पहिला प्रयोग जिल्ह्यात तहसीलदार ज्योती देवरे यांनी यशस्वीपणे राबविला. पारनेरच्या तहसिलदार ज्योती देवरे यांच्या आदेशानुसार रविवारी पारनेर तालुक्यात महसूल विभाग व आरोग्य विभागाच्या वतीने लग्न समारंभ, विवाह साखरपुडा कार्यक्रमाला हजर असलेल्याची सामुहिक करोना चाचणी  करून घेतली. तालुक्यात करोनाची दुसरी लाट कमी होण्याचे नाव घेताना दिसत नाही. उलट दिवसेंदिवस करोना बाधीतांचा आकडा वाढताना दिसत आहे. यामुळे तहसीलदार देवरे यांनी दोन दिवसापूर्वी तालुक्यातील 71 गावे संवेदनशील घोषित करून त्या ठिकाणी संपूर्ण लॉकडाऊनचे आदेश काढले. काल मोठी लग्नतिथी असल्याने मोठ्या संख्याने एकत्र येतील आणि एकमेंकांचा संपर्क वाढून संसर्ग वाढण्याची भीती होती.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here