शिवसेनेच्या माध्यमातून तालुक्यात विकासकामांना गती : मा. आ. औटी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, July 6, 2021

शिवसेनेच्या माध्यमातून तालुक्यात विकासकामांना गती : मा. आ. औटी

 शिवसेनेच्या माध्यमातून तालुक्यात विकासकामांना गती : मा. आ. औटी

पळसपूर येथे 67 लक्ष रुपयाच्या विकासकामांचे भूमिपूजन


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः  पारनेर तालुक्यात शिवसेनेच्या माध्यमातून विकास कामांना गती मिळाली आहे.   यापुढील काळात ही तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये खर्‍या अर्थाने  विकास कामांसाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत असे विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी यांनी पळसपुर येथे विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना सांगितले.
दरम्यान पळसपुर ता. पारनेर येथे जिल्हा परिषद अहमदनगर अंतर्गत 67 लक्ष रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन  महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे माजी  उपाध्यक्ष माननीय विजयराव औटी साहेब यांच्या शुभहस्ते व जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समिती सभापती मा. काशिनाथ दाते सर, पंचायत समिती पारनेर चे सभापती गणेश शेळके, शिवसेना तालुकाप्रमुख विकास रोहोकले, डोंगरवाडी गडाचे  नामदेव महाराज घुले या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला यामध्ये
 1.  लेखशीर्ष 5054 अंतर्गत पळसपूर ते डोंगरवाडी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे- रु. 30 लाख,    
2. लेखशीर्ष 5054 अंतर्गत पळसपूर  ते काताळवेढा रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे - 25 लाख,
3. जनसुविधा अंतर्गत पळसपूर, ढगेवाडी येथील स्मशानभूमी सुशोभीकरण करणे- रु. 8 लाख,
4.  ढगेवाडी येथे जिल्हा परिषद 15 वा वित्तायोग मधून पाण्याची टाकी करणे- रु. 4 लाख, असे एकुण 67 लक्ष रुपयांचे विकास कामांचा समावेश आहे
यावेळी पळसपुर चे उपसरपंच किसनराव डोंगरे, माजी सरपंच महादू शेठ पवार, प्रवीण शेठ डोंगरे, गणपत शेठ पवार, सावळाराम डोंगरे, रामदास ढोले, श्रीकांत वाघमारे, विष्णू आहेर, संदीप आहेर, भाऊसाहेब आहेर,जनाशेठ डोंगरे, योगेश डोंगरे, वारणवाडी चे सरपंच संतोष मोरे, पोखरी चे सरपंच सतीश पवार ,उपसरपंच परसराम शेलार, संदीप डोंगरे, भास्कर पवार, हनुमंत पवार, भाऊशेठ पवार, दत्ता डोंगरे ,धोंडीभाऊ डोंगरे , माजी सरपंच ठकाशेठ कडुस्कर, सुदाम गाजरे, ग्रा. पं. सदस्य संभाजी डोंगरे, उपसरपंच अजित भाईक, कृ. बाजार समिती सं. खंडू भाईक, ह. भ. प. घुले महाराज, राजू डोंगरे , कामाचे ठेकेदार फारुक शेख, सार्वजनिक बांधकाम शाखा अभियंता शिवाजी महांडुळे, ग्रामसेवक जाधव भाऊसाहेब इ. उपस्थित होते.

No comments:

Post a Comment