साकतखुर्द शिवारात पेट्रोल पंपावर धडसी दरोडा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, July 31, 2021

साकतखुर्द शिवारात पेट्रोल पंपावर धडसी दरोडा

 साकतखुर्द शिवारात पेट्रोल पंपावर धडसी दरोडा
नगरी दवंडी / प्रतिनिधी

अहमदनगर : नगर सोलापूर महामार्गावर साकतखुर्द गावानजीक असलेल्या भारत पेट्रोलियम कंपनीच्या केतन पेट्रोल पंपावर मध्यरात्री धाडसी दरोडा पडला आहे. रात्री अडीच तीनच्या सुमारास सहा ते सात अज्ञात दरोडेखोरांनी केतन पेट्रोल पंपावर शस्त्रांचा धाक दाखवत कर्मचाऱ्यांना मारहाण करत दीड ते दोन लाखांची रक्कम लुटल्याची प्राथमिक माहिती आहे. मारहाणीत पेट्रोल पंपावर काम करणारे दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. यावेळी पेट्रोल भरण्यासाठी साठी थांबलेल्या काही ट्रक चालकांनाही मारहाण करत त्यांच्या कडील मोबाईल व वाहनांच्या चाव्या काढून घेण्यात आल्या.

दरम्यान या घटनेची खबर मिळताच तालुका पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून श्वान पथकला पाचारण करण्यात आले. गुन्हे शाखेचे पथकही घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास सुरु आहे. मध्यरात्री झालेल्या दरोड्यामुळे साकत परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here