माजी आमदार राम शिंदे यांनी केला ठाकरे सरकारवर गंभीर आरोप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, July 31, 2021

माजी आमदार राम शिंदे यांनी केला ठाकरे सरकारवर गंभीर आरोप

 माजी आमदार राम शिंदे यांनी केला ठाकरे सरकारवर गंभीर आरोप

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर मुख्यमंत्री ठाकरे सवंग लोकप्रियतेसाठी केवळ घोषणाबाजी करीत आहेत. ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही, एवढ्या एकाच आश्वासनाचे वाक्य वारंवार उच्चारत प्रत्यक्षात मात्र ओबीसींची उपेक्षाच करत आहेत.
मराठा  व ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नासंबंधी राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने आतापर्यंत वेळकाढूपणा केला आहे. आता पूरग्रस्तांच्या मदतीचे निमित्त मिळाले आहे. तेथेही मदतीचे केवळ आश्वासन देत पूरग्रस्तांच्या तोंडाला पानेच पुसली जात आहेत. मात्र, त्या आडून मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर पडदा टाकण्याचे कारस्थान सरकारमधील मंडळींनी रचले आहे,’ असा आरोप भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केला. सरकारच्या धोरणशून्य कारभारामुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षणदेखील गमावल्याने मुख्यमंत्र्यांची विश्वासार्हता संपुष्टात आली आहे. ठाकरे सरकारकडे धोरण नाही आणि निर्णय घेण्याची हिंमत वमुख्यमंत्री ठाकरे सवंग लोकप्रियतेसाठी केवळ घोषणाबाजी करीत आहेत. ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही, एवढ्या एकाच आश्वासनाचे वाक्य वारंवार उच्चारत प्रत्यक्षात मात्र ओबीसींची उपेक्षाच करत आहेत.
ठाकरे सरकारकडे धोरण नाही आणि निर्णय घेण्याची हिंमत व क्षमतादेखील नाही. हे मराठा आरक्षणाप्रमाणेच ओबीसी आरक्षणातील वेळकाढूपणामुळे स्पष्ट झाले आहे, असे शिंदे पुढे म्हणाले. ’सवंग लोकप्रियता नको असे म्हणत जनहिताचे निर्णयदेखील खुंटीवर टांगणार्‍या ठाकरे सरकारच्या कणाहीन धोरणामुळे मराठा आरक्षणाप्रमाणे ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नालाही ग्रहण लागले आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारच्या नव्या निर्णयामुळे ओबीसी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याची अनिश्चितता संपुष्टात आली आहे. महाराष्ट्रातील ओबीसींच्या आरक्षणाचा मुद्दा ठाकरे सरकारच्या धरसोडपणामुळे टांगणीवर पडलेला आहे. ठाकरे सरकारने केलेल्या अन्यायावर केंद्र सरकारच्या निर्णयामुळे मलमपट्टी झाली आहे. अन्यथा ओबीसी विद्यार्थ्यांची महाराष्ट्रात परवड झाली असती.’असे आरोप ही माजीमंत्री राम शिंदे यांनी केले आहेत. क्षमतादेखील नाही. हे मराठा आरक्षणाप्रमाणेच ओबीसी आरक्षणातील वेळकाढूपणामुळे स् पष्ट झाले आहे, असे शिंदे पुढे म्हणाले.
‘सवंग लोकप्रियता नको असे म्हणत जनहिताचे निर्णयदेखील खुंटीवर टांगणार्‍या ठाकरे सरकारच्या कणाहीन धोरणामुळे मराठा आरक्षणाप्रमाणे ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नालाही ग्रहण लागले आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारच्या नव्या निर्णयामुळे ओबीसी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याची अनिश्चितता संपुष्टात आली आहे. महाराष्ट्रातील ओबीसींच्या आरक्षणाचा मुद्दा ठाकरे सरकारच्या धरसोडपणामुळे टांगणीवर पडलेला आहे. ठाकरे सरकारने केलेल्या अन्यायावर केंद्र सरकारच्या निर्णयामुळे मलमपट्टी झाली आहे. अन्यथा ओबीसी विद्यार्थ्यांची महाराष्ट्रात परवड झाली असती.’असे आरोप ही माजीमंत्री राम शिंदे यांनी केले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here