भावी पिढीला चांगले संस्कार व मार्गदर्शन करून घरातच गुरुपद प्राप्त करण्याचा प्रयत्न करा ः उध्दव महाराज - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, July 24, 2021

भावी पिढीला चांगले संस्कार व मार्गदर्शन करून घरातच गुरुपद प्राप्त करण्याचा प्रयत्न करा ः उध्दव महाराज

 भावी पिढीला चांगले संस्कार व मार्गदर्शन करून घरातच गुरुपद प्राप्त करण्याचा प्रयत्न करा ः उध्दव महाराज

सदगुरु नारायणगिरी महाराज प्रबोधन प्रतिष्ठान व संत तुकाराम महाराज मंदिरात गुरुपौर्णिमा उत्साहात


नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः गुरुवर्य उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा बुद्रुक शिवारातील सुरेगाव रस्त्यावर असलेल्या  सदगुरु नारायणगिरी महाराज प्रबोधन प्रतिष्ठान व नेवासा येथील संत तुकाराम महाराज मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.यावेळी उपस्थित मोजक्याच भाविकांनी संतपूजन केले.भावी पिढीला चांगले संस्कार व मार्गदर्शन करून घरातच गुरुपद प्राप्त करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न आजी आजोबांसह मुलांच्या आईवडिलांनी करावा असे आवाहन ह.भ.प.गुरुवर्य उध्दव महाराज महाराज मंडलिक नेवासेकर यांनी यावेळी बोलतांना केले.
यावेळी सदगुरु नारायणगिरी महाराज प्रबोधन प्रतिष्ठानमध्ये झालेल्या कार्यक्रम प्रसंगी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य ह.भ.प.उद्धव महाराज मंडलिक यांच्या हस्ते ब्रम्हलिन गुरुवर्य सदगुरु नारायणगिरी महाराजांच्या मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले.तसेच नेवासा शहरातील संत तुकाराम महाराज मंदिरात ही सायंकाळी झालेल्या कार्यक्रम जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात
या दोन्हीही ठिकाणी मोजक्याच भाविकांच्या  उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात गुरुसंदेश देतांना
हभप उद्धव महाराज मंडलिक म्हणाले की न्यास परंपरेतील ज्ञानदान करणारे ऋषी व संत परंपरेतील संत
यांचे पूजन गुरुपौर्णिमेला केले जाते,ज्यांनी जन्म दिला त्या आईवडीलांना तसेच शाळेचे शिक्षक यांच्या ज्ञान दान व संस्कार देण्याच्या कार्याला वंदन करण्याचा हा दिवस आहे. आज चांगली पिढी घडवायची असेल तर मुलांवर चांगले संस्कार करणे आवश्यक आहे आई वडिलांनी ही पुढच्या पिढीला सुसंस्कारित करण्याची जबाबदारी घेण्याची गरज असून त्यांनी भावी पिढीसाठी केलेले संस्कारामुळे त्यांना आपोआपच गुरुपद हे प्राप्त होईल असा संदेश देऊन त्यांनी संत प्रसंगी किती कठोर शब्दाचा वापर करतात परंतु त्यांचा हेतू भक्तांच्या कल्याणाचा असतो हे सांगताना सदगुरू नारायणगिरी महाराजांच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. तद्नंतर आहिल्यादेवीनगर येथील संतसेवक रखमाजी नाचन यांच्या परीवाराकडून भाविकांना महाप्रसाद देण्यात आला.
यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी ह.भ.प.अंकुश महाराज जगताप, गिरीजानाथ महाराज जाधव, कृष्णा महाराज मोरे, प्रा. रामनाथ नन्नवरे, प्रा. मुरलीधर कराळे, प्रा.नामदेवराव शिंदे,इंजिनिअर सुनिल वाघ,नगरसेवक जितेंद्र कु-हे, उद्योजक प्रभाकर शिंदे,संतोष काळे,प्रकाश  वाकचौरे,बन्सीभाऊ आगळे, कृष्णा शिंदे,भिकाजी खोसे,दीपक अपार,जयदीप जामदार,सुदामराव मंडलिक, डॉ.राउत, शोभाताई दिघे, बाळकृष्ण भागवत यांच्यासह पंचक्रोशीतील भाविक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment