केंद्र सरकारने मराठा आरक्षणाचा अद्यादेश काढावा ः खा. संभाजीराजे. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, July 3, 2021

केंद्र सरकारने मराठा आरक्षणाचा अद्यादेश काढावा ः खा. संभाजीराजे.

 केंद्र सरकारने मराठा आरक्षणाचा अद्यादेश काढावा ः खा. संभाजीराजे.


जामखेड -
मराठा आरक्षण लढयात आतापर्यंत बर्‍याच घडामोडी होऊन गेल्या. शेवटचा पर्याय म्हणून केंद्र सरकारने दाखल केलेली फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. असे असले तरी सर्व मार्ग बंद झालेले नाहीत. केंद्र सरकाराने यासाठी अध्यादेश काढावा. त्यानंतर हा कायदा मंजूर करून घ्यावा, हा पर्याय खुला आहे. त्याला काही अवधी लागू शकतो. त्या काळात राज्य सरकारने त्यांच्या हातात जे देता येणे शक्य आहे, असे मत खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केले आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर संभाजीराजे यांनी काढलेला संवाद दौर्‍या निमित्ताने जामखेडस आले होते तेव्हा ते बोलत होते. जामखेडकरांनी संभाजीराजेंचे जोरदार स्वागत केले.
खा. संभाजी राजे पुढे म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी आता केंद्र सरकारने अध्यादेश काढणे आणि नंतर त्याचा कायदा करून घेणे हा एकमेव पर्याय राहिला आहे. मात्र, तोपर्यंत राज्य सरकारने या प्रक्रियेला मदत करताना जे आपल्या हातात आहे, ते मराठा समाजाला द्यावे. या लढयातून मला स्वत:ला काहीही साध्य करायचे नाही. राज्यातील 70 टक्के मराठा समाज गरीब आहे, त्यांच्यासाठी आपला हा लढा सुरू आहे. आरक्षणाचे जनक शाहू महाराज यांनी जे आरक्षण दिले होते, ते सर्व समाजातील गरिबांसाठी होते. त्यांचाच आदर्श घेऊन आम्हाला बहुजन समाज जोडायचा आहे. मराठा समाजाला तेव्हा मिळालेले आरक्षण नंतर मागे पडले. ते मिळविण्यासाठी आता लढा सुरू आहे. असेही ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here